AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापौरपदासाठी पक्ष सोडणाऱ्या राखी कंचर्लावार दुसऱ्यांदा चंद्रपूरच्या महापौर

महापौरपदासाठी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये आलेल्या राखी कंचर्लावार दुसऱ्यांदा ही जबाबदारी (Chandrapur Mayor Election) सांभाळणार आहेत.

महापौरपदासाठी पक्ष सोडणाऱ्या राखी कंचर्लावार दुसऱ्यांदा चंद्रपूरच्या महापौर
| Updated on: Nov 22, 2019 | 3:22 PM
Share

चंद्रपूर : भाजपच्या राखी कंचर्लावार चंद्रपूर शहराच्या नव्या महापौर असतील, तर भाजपच्या राहुल पावडे यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. पाच वर्षांपूर्वी महापौरपदासाठी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये आलेल्या कंचर्लावार दुसऱ्यांदा ही जबाबदारी (Chandrapur Mayor Election) सांभाळणार आहेत.

2014 मध्ये काँग्रेसमधून फुटून भाजपची मदत घेत राखी कंचर्लावार चंद्रपूरच्या महापौरपदी विराजमान झाल्या होत्या. 2017 मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत त्या भाजपच्या तिकिटावर नगरसेविका झाल्या.

चंद्रपूर शहर महापालिकेच्या महापौर-उपमहापौरपदासाठीची निवडणूक गांधी चौकातील महात्मा गांधी भवनात सकाळी सुरु झाली. राणी हिराई सभागृहात सर्वप्रथम महापौर निवडणुकीतील काँग्रेसच्या सुनिता लोढीया यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत थेट लढत भाजपच्या राहुल पावडे आणि काँग्रेसच्या अशोक नागापुरे यांच्यात होणार असल्याचं निश्चित झालं.

महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार राखी कंचर्लावार यांना 42 मतं मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या कल्पना लहामगे यांना 22 मतं मिळाली.

उपमहापौरपदाच्या निवडणुकीत विद्यमान स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांची लढत काँग्रेसच्या अशोक नागापुरे यांच्याशी झाली. तिथेही 42 विरुद्ध 22 मतांनी भाजपचा विजय झाला.

मुंबई-पुणे ते नागपूर-चंद्रपूर, कोणत्या शहराचं महापौरपद कोणाकडे?

चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तागट नव्या महापौरपदाच्या उमेदवारीबद्दल नाराज असल्याच्या वार्ता होत्या. त्यासाठी या सर्व नगरसेवकांना पेंच आणि नंतर ताडोबातील रिसॉर्टमध्ये पर्यटन घडवण्यात आले. भाजपला आपला स्वतःचा गट एकत्र ठेवण्यात यश मिळाले असून त्यामुळे शहर मनपावर भाजपचा पुन्हा एकदा झेंडा रोवला गेला आहे.

दिग्गज भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या समर्थक नगरसेवकांनी भाजपचा हा गड कायम राखला. नवनिर्वाचित महापौर राखी कंचर्लावार (Chandrapur Mayor Election) यांनी शहर विकासासाठी आपण कटिबद्ध राहू, अशी भावना व्यक्त केली आहे.

राखी कंचर्लावार यांचा राजकीय प्रवास

– 2012 मध्ये महापालिका स्थापन झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर विजय – अडीच वर्षांनंतर शहराच्या दुसऱ्या महापौर झाल्या. यासाठी काँग्रेसमधून फुटून भाजपची मदत घेत महापौरपदी – 2017 मध्ये झालेल्या महापालिकेच्या दुसऱ्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर विजय – यावेळीही महापौरांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यावर पुन्हा महापौरपदी विराजमान – चंद्रपूर मनपा महापौरपदाच्या आतापर्यंत चारही सोडतीमध्ये महिलांसाठी आरक्षण होतं

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.