ओबीसींना आरक्षण द्या, भाजपचा आघाडीला डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम; मंत्र्यांना दिला ‘हा’ इशारा

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप अधिकच आक्रमक झाली आहे. महाविकास आघाडी सरकारने ओबीसींना आरक्षण दिलंच पाहिजे. (chandrashekhar bawankule)

ओबीसींना आरक्षण द्या, भाजपचा आघाडीला डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम; मंत्र्यांना दिला 'हा' इशारा
Chandrashekhar Bawankule

नवी दिल्ली: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप अधिकच आक्रमक झाली आहे. महाविकास आघाडी सरकारने ओबीसींना आरक्षण दिलंच पाहिजे. आम्ही आघाडी सरकारला डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम देतो. आरक्षण दिलं नाही तर आघाडीच्या मंत्र्यांना गावांमध्ये फिरू देणार नाही, असा इशाराच भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. (chandrashekhar bawankule ultimatum maha vikas aghadi over obc reservation)

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मीडियाशी बोलताना हा इशारा दिला आहे. कायम केंद्राकडे बोट दाखवायच काम आता महाविकास आघाडीला करता येणार नाही. केंद्रानं आता राज्याला सर्वाधिकार होते, दिले आहेत आणि राहतील अशी व्यवस्था केलीय. फडणवीस सरकारनं आरक्षण दिल आणि टिकवूनही दाखवलं होतं. या सरकारला मराठा आणि ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचचं नाहीये. आता जे विधेयक पास होईल त्यानंतरही जर दुर्लक्ष झालं तर आम्ही गप्प बसणार नाही, असं सांगतानाच ओबीसी आरक्षणासाठी आम्ही महाविकास आघाडीला डिसेंबरपर्यंतचा अल्टीमेटम देत आहोत. जर आरक्षण दिल नाही, समाजाला न्याय दिला नाही तर राज्यातल्या एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.

पक्षाध्यक्ष बदलण्याची बातमी चुकीची

यावेळी त्यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या बदलावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. चंद्रकांत पाटील हे आमचे नेते आहेत. त्यांच्या काळात पक्ष मोठा झाला. राज्यातील मंत्र्यांना भेटायला आम्ही दिल्लीत आलो आहोत. मात्र पक्षाध्यक्ष बदलण्याची बातमी 100 टक्के चुकीची आहे. ही बातमी जाणीवपूर्वक पेरली गेली आहे. हे कोणी केलं? आणि का केलं? याचा आम्ही शोध घेऊच, असं सांगतानाच कोण पसरवतंय, करतंय हे आम्हाला चांगल माहिती आहे, असं ते म्हणाले. केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठीनं राज्याला जास्तीत जास्त फायदा कसा होईल यावर लक्ष देतोय. राजकीय फायद्यासाठी हे करणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

आघाडीचा अॅटो पंक्चर

राज्यातील महाविकास आघाडीच सरकारचा ॲटो पंक्चर झालाय. त्यांनी राज्यातल्या जनतेच प्रचंड नुकसान केलंय. हजारो कोटींचा भ्रष्टाचार सुरू आहे. यांची इतकी वाईट अवस्था आहे की यांच्या ॲटो स्क्रॅबमध्येही कुणी घेणार नाही, अशी खोचक टीका त्यांनी केली. (chandrashekhar bawankule ultimatum maha vikas aghadi over obc reservation)

संबंधित बातम्या:

VIDEO: पश्चिम बंगालमध्ये जी स्थिती होती, तशीच परिस्थिती ठाकरे सरकारला महाराष्ट्रात घडवायचीय; नितेश राणेंचा हल्लाबोल

प्रकाश आंबेडकरांच्या ‘अकोला पॅटर्न’चे शिलेदार मखराम पवार यांचे निधन

सोनेरी नीरजचं मोदींबद्दलचं ‘ते’ ट्विट 2 वर्षानंतर लोकांच्या हाती लागलंच, ज्यात तो म्हणाला होता……

(chandrashekhar bawankule ultimatum maha vikas aghadi over obc reservation)

Published On - 2:40 pm, Sun, 8 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI