AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही सांगाल ते करायला न्यायदेवता म्हणजे सीबीआय, ईडी नाही; भुजबळांचा चंद्रकांतदादांवर पलटवार

छगन भुजबळांनी मीडियाशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांच्या धमकीची खिल्ली उडवली. (chhagan bhujbal reaction on chandrakant patil threat)

तुम्ही सांगाल ते करायला न्यायदेवता म्हणजे सीबीआय, ईडी नाही; भुजबळांचा चंद्रकांतदादांवर पलटवार
छगन भुजबळ आणि चंद्रकांत पाटील
| Updated on: May 03, 2021 | 1:56 PM
Share

नाशिक: छगन भुजबळ तुम्ही जामिनावर बाहेर आहात. निर्दोष सुटलेले नाहीत. फार बोलू नका. नाही तर महागात पडेल, या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या धमकीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पलटवार केला आहे. तुम्ही सांगाल ते करायला न्यायदेवता म्हणजे सीबीआय, ईडी नाही, असा टोला छगन भुजबळांनी लगावला आहे. (chhagan bhujbal reaction on chandrakant patil threat)

कुणाकुणावर रागावणार?

छगन भुजबळांनी मीडियाशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांच्या धमकीची खिल्ली उडवली. ममता बॅनर्जी या झाशीच्या राणी सारख्या एकहाती लढल्या. झाशीच्या राणीने मेरी झाशी नही दुंगी असं म्हटलं होतं. ममता दीदींनीही मेरा बंगाल नही दुंगी असं म्हटलं. माझ्या या विधानावर रागावण्यासारखं काय आहे? आता पराभवाची सवय करून घेतली पाहिजे. पराभव सहन करायला हवा. आता वारंवार फटके बसणार, तुम्ही किती लोकांवर रागावणार आहात?, असा चिमटाही त्यांनी काढला.

चंद्रकांतदादांची मानसिक गडबड

समीर भुजबळ जेलमध्ये असताना चंद्रकांतदादांकडे मदत मागायला कसा जाईल? सीबीआय, ईडीचा राजकीय उपयोग होतो हे माहीत होतं. आता न्याय देवताही त्यांच्या हातात आहे का? असा प्रश्न मला पडला आहे. तुम्ही सांगाल ते करायला न्यायदेवता म्हणजे ईडी किंवा सीबीआय नाही, असं सांगतानाच अचानक झालेल्या पराभवाने मानसिक गडबड होणं स्वाभाविक आहे. त्यामुळेच वडाचं तेल वांग्यावर टाकण्याचा प्रकार सुरू आहे, असा टोलाही त्यांनी लागवला.

सीबीआय, आयबीने धमकावणाऱ्यांना शोधावं

यावेळी त्यांनी सीरमच्या अदर पूनावालांबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. पूनावाला यांना एका मोठ्या व्यक्तीने धमक्या दिल्या. हे त्यांनी लंडनमध्ये जाऊन सांगितलं. आता सीबीआय आणि आयबीने इतर कामे करण्यापेक्षा पूनावाल यांना धमकावणाऱ्या व्यक्तीला शोधून काढलं पाहिजे, असं ते म्हणाले. पूनावालांना संरक्षण देऊन लस निर्मितीचं काम सुरू करा. पूनावाला यांना धमकी येणं चिंताजनक आहे. त्यांच्या तक्रारीची दखल कोणी घ्यायची? असा सवाल करतानाच पूनावाला यांना धमकी आल्याने त्याचा लस उत्पादनावर परिणाम होणार होईल, असंही ते म्हणाले.

अदृश्य हात नव्हे, स्पष्ट हात

यावेळी त्यांनी बंगाल निवडणुकीवरही भाष्य केलं. बंगाल निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा केवळ अदृश्य हातच नाही तर स्पष्ट हात होता, असं त्यांनी सांगितलं. पवारांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मदत केली हे जगजाहीर आहे, असंही ते म्हणाले.

लॉकडाऊनचा निर्णय घ्या

भुजबळांनी लॉकडाऊनचं समर्थन केलं. सुप्रीम कोर्टाने देखील आता लॉकडाऊनबाबत सांगितलं आहे. त्यावर निर्णय होईल अशी अपेक्षा आहे, असंही ते म्हणाले. (chhagan bhujbal reaction on chandrakant patil threat)

संबंधित बातम्या:

‘चंद्रकांतदादा… दैदिप्यमान कामगिरीमुळेच तुम्हाला कोल्हापूर सोडून पुण्यातील मतदारसंघ निवडावा लागला’

पब्लिसिटीसाठीच काम करेन असं वागणं बरं नव्हं; नवाब मलिकांचा मोदींना टोला

LIVE | नाशिकमध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम आढावा बैठकीला सुरुवात

(chhagan bhujbal reaction on chandrakant patil threat)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.