Eknath Shinde : मुंबईत येऊन दाखवा, या रस्त्याने जाऊन दाखवा म्हणत होते, काय झालं?; मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला डिवचले

शितलताई आज तुम्ही आमच्यासोबत आलेल्या आहात. सगळ्यांना धन्यवाद देतो. आपण पक्ष सोडलेला नाही. कुठल्या पक्षात गेलेलो नाही. बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे आपण शिवसैनिक आहोत.

Eknath Shinde : मुंबईत येऊन दाखवा, या रस्त्याने जाऊन दाखवा म्हणत होते, काय झालं?; मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला डिवचले
माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांचा शिंदे गटात प्रवेशImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 9:07 PM

मुंबई : मुंबई महापालिकेतील दहिसर विभागाच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी शिंदे गटात प्रवेश (Entry) केला आहे. शिंदे गट गुवाहाटीला गेल्यानंतर शीतल म्हात्रे यांनी बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल केला होता. मात्र त्याच शीतल म्हात्रे आज शिंदे गटात सामील झाल्या आहेत. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपली प्रतिक्रिया दिली आहे. शीतल म्हात्रे यांनी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जातोय, त्याला पाठिंबा दिलाय. शितलताई आज तुम्ही आमच्यासोबत आलेल्या आहात. सगळ्यांना धन्यवाद देतो. आपण पक्ष सोडलेला नाही. कुठल्या पक्षात गेलेलो नाही. बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे आपण शिवसैनिक आहोत. माझ्या राजकीय जीवनात ज्यांना ज्यांना मी शब्द दिला तो मी कधीच मोडला नाही, असे शिंदे यावेळी म्हणाले.

हिंदुत्वाच्या भगव्याशी प्रतारणा आम्ही केली नाही

आम्ही सर्वजण 40 शिवसेनेचे आणि 10 सहयोगी आणि अपक्ष आमदार ही भूमिका घेऊन पुढे निघालो. त्याची नोंद सगळ्यांनी घेतलेली आहे. मी सत्तेमध्ये होतो तेव्हा माझ्यासोबत 7 ते 8 मंत्री होते. असे असूनही एक विचारधारा सोबत ठेवून पुढे जातो म्हणजे आम्हाला काही मिळत नाही म्हणून आम्ही गेलो असं नाही. बाळासाहेबांच्या विचारधारेशी, हिंदुत्वाच्या भगव्याशी प्रतारणा आम्ही केली नाही. पण गेले अडीच वर्षे आम्हाला त्यांच्यासोबत राहावं लागलं. दाऊदशी संबंध असणाऱ्या लोकांसोबत आम्हाला राहावं लागलं, त्यावर काही बोलता आलं नाही. शिवसैनिकांचं खच्चीकरण झालं होतं. आम्ही जो निर्णय घेतला तो बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणार नाही. मुंबईतल्या 5 आमदारांनी आमच्या या भूमिकेला पाठिंबा दिलाय. नितीन देशमुख नावाचा आमदार त्याला घरी जायचं होत त्याला मी स्पेशल विमान करून दिलं. पळवून नेलं किडनॅप केलं अस म्हणण्यात आलं.

मुंबईत येऊन दाखवा, या रस्त्याने जाऊन दाखवा पण काही झालं का ?

सभागृहात आल्यानंतर त्याने कोणाला मतदान केले हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. काही लोक तर म्हणत होते मुंबईत येऊन दाखवा, या रस्त्याने जाऊन दाखवा पण काही झालं का ? त्याउलट आणखी एक आमदार वाढला. लोकशाहीत नंबर्सला खूप महत्व असतं. आमचं बहुमताच सरकार आहे. काही जण म्हणतायत की राज्यपालांनी चुकीच्या पद्धतीने शपथविधी दिलेला आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड चुकीची आहे असं सांगण्यात आलं. त्यांनी 4 याचिका टाकल्या होत्या. न्यायव्यस्थेवर आमचा विश्वास आहे. योग्य तो निर्णय येईल. (Chief Minister Eknath Shindes reaction to the entry of Sheetal Mhatre)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता, शरद पवारांची कबुली
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता, शरद पवारांची कबुली.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?.
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार.
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट.
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा.
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना.
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.