25 वर्षात काय केलं? प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला काँग्रेस आमदारने कानशिलात लगावली!

संगरुर (पंजाब) : पंजाबच्या माजी मुख्यमंत्री रजिंदर कौर भट्टल यांनी भर प्रचारसभेत एका तरुणाच्या कानशिलात लगावली. मूनक येथील बुशेरा गावात हा प्रकार घडला. प्रचारसभेदरम्यान एका तरुणाने रजिंदर कौर भट्टल यांच्याकडे 25 वर्षांतील कामाचा हिशेब मागितला, तर भट्टल यांनी थेट तरुणाच्या कानशिलातच लगावली. कुलदीप सिंह असे तरुणाचे नाव आहे. एवढी वर्षे तुम्ही या विधानसभा मतदारसंघात आमदार …

25 वर्षात काय केलं? प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला काँग्रेस आमदारने कानशिलात लगावली!

संगरुर (पंजाब) : पंजाबच्या माजी मुख्यमंत्री रजिंदर कौर भट्टल यांनी भर प्रचारसभेत एका तरुणाच्या कानशिलात लगावली. मूनक येथील बुशेरा गावात हा प्रकार घडला. प्रचारसभेदरम्यान एका तरुणाने रजिंदर कौर भट्टल यांच्याकडे 25 वर्षांतील कामाचा हिशेब मागितला, तर भट्टल यांनी थेट तरुणाच्या कानशिलातच लगावली. कुलदीप सिंह असे तरुणाचे नाव आहे.

एवढी वर्षे तुम्ही या विधानसभा मतदारसंघात आमदार आहात, तुम्ही इतक्या वर्षात काय काम केलं?, असा प्रश्न माजी मुख्यमंत्री रजिंदर कौर भट्टल यांना कुलदीपने विचारला. या प्रश्नावरुन रजिंदर कौर भट्टल यांना राग आला आणि त्यांनी तरुणावर हात उचलला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

संगरुर येथील काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित सभेत भाषण करण्यासाठी माजी मुख्यमंत्री रजिंदर कौर भट्टल आल्या होत्या.

भट्टल यांनी कुलदीपच्या कानशिलात लगावण्याआधी, कुलदीप काँग्रेसविरोधात घोषणाबाजी करत होता. त्यावेळी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी कुलदीपला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुलदीप ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. नंतर मग थेट रजिंदर कौर भट्टल यांनी कुलदीपच्या कानशिलातच लगावली.

माजी मुख्यमंत्री रजिंदर कौर भट्टल यांनी 20 वर्षांहून अधिक काळ या भागात सत्ता गाजवली आहे. मात्र, त्यांनी काहीच विकास केला नाही, असा आरोप कुलदीप सिंह या तरुणाचा आहे.

दुसरीकडे, रजिंदर कौर भट्टल या लेहरा विधानसभा मतदारसंघातून 1992 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर जिंकल्या होत्या. त्यानंतर आतापर्यंत सलग पाचवेळा त्या विधानसभा निवडणूक जिंकल्या आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *