AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्यक्तिगत आयुष्याचा मुद्दा बनवणारी ‘ही’ मंडळी भ्याड; चित्रा वाघ यांचं चाकणकरांना अप्रत्यक्ष उत्तर

अन्यायाविरोधात आवाज उठवल्यानंतर व त्यातही आवाज उठवणारी जर स्त्री असेल तर व्यक्तिगत आयुष्याचा मुद्दा बनवणारी 'ही' मंडळी भ्याडच म्हणावी लागतील, अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना अप्रत्यक्ष उत्तर दिलं आहे. Chitra Wagh Answer Rupali Chakankar

व्यक्तिगत आयुष्याचा मुद्दा बनवणारी 'ही' मंडळी भ्याड; चित्रा वाघ यांचं चाकणकरांना अप्रत्यक्ष उत्तर
रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ
| Updated on: Apr 08, 2021 | 6:59 AM
Share

मुंबई : अन्यायाविरोधात आवाज उठवल्यानंतर व त्यातही आवाज उठवणारी जर स्त्री असेल तर व्यक्तिगत आयुष्याचा मुद्दा बनवणारी ‘ही’ मंडळी भ्याडच म्हणावी लागतील, अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना अप्रत्यक्ष उत्तर दिलं आहे. (Chitra Wagh Answer Rupali Chakankar through Tweet)

गेल्या तीन दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ महाविकास आघाडीवर कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन हल्लाबोल करत होत्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर त्यांना प्रत्युत्तर देऊन त्यांच्यावर पलटवार करत होत्या. मात्र वाघ यांनी चाकणकर यांना प्रत्युत्तर दिलेलं नव्हतं. बुधवारी एक ट्विट करत त्यांनी रुपाली चाकणकर यांना अप्रत्यक्ष उत्तर दिलं आहे. या ट्विटमध्येही त्यांनी चाकणकर यांचं नाव घेतलेलं नाही.

चित्रा वाघ यांचं ट्विट काय?

अन्यायाविरोधात आवाज उठवल्यानंतर व त्यातही आवाज उठवणारी जर स्त्री असेल तर व्यक्तिगत आयुष्याचा मुद्दा बनवणारी “ही”मंडळी भ्याडच म्हणावी लागतील सूडाच्या भावनेतून होणारं राजकारण फार काळ टिकणारं नाही हे लक्षात ठेवा, असं चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

चित्रा वाघ- रुपाली चाकणकर यांच्यातल्या वादाची पार्श्वभूमी?

अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली होती. देशमुखांनी तर राजीनामा दिला आता प्रश्न आहे की नवा वसूली मंत्री कोण?, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली होती.

चित्रा वाघ यांच्या टीकेला रुपाली चाकणकरांचं उत्तर

“ताईंचा नवरा स्वतः भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी असून त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल आहे आणि ताई विचारत आहेत नवीन वसुली मंत्री कोण??अहो ताई भावनेच्या भरात इतकंही वाहून जाऊ नका की अंगलट आलं की परत ‘पवार साहेब माझ्या वडिलांसारखेच आहेत’ हे म्हणायची वेळ येईल.थोडा धीरज रखो , सब सच सामने आयेगा.!!” अशा शब्दात चाकणकर यांनी सुनावलं होतं.

चित्रा वाघ यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांना शुभेच्छा

देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपदाचा कार्यभार सोपवण्यात आल्या. ज्यानंतर चित्रा वाघ यांनी वळसे पाटील यांना शुभेच्छा देणारी पोस्ट लिहिली.

महाराष्ट्रात महिला मुलींवर होणाऱ्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी कठोर पावले उचलत घटनांची तात्काळ दखल घ्याल ह्या अपेक्षांसह मन:पूर्वक शुभेच्छा, अशा शब्दात नवनिर्वाचित गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना चित्रा वाघ यांनी शुभेच्छा दिल्या. त्याला चाकणकरांनी उत्तर दिलं.

चाकणकरांचा चित्रा वाघ यांच्यावर बोचऱ्या शब्दात प्रतिहल्ला

कर्तव्यनिष्ठ ही दिलीपराव वळसे पाटीलसाहेबांची ओळख आहे. कारवाई होऊ नये म्हणून पक्ष बदलणाऱ्या लाचखोरांनी जरी त्यांना आज शुभेच्छा दिल्या असल्या तरी ते अशा गुन्हेगारांना सोडणार नाहीत. अशा बोचऱ्या शब्दात चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर हल्ला केला.

Posted by Rupali Chakankar on Tuesday, 6 April 2021

हे ही वाचा :

पवार माझे बाप म्हणायचं, अशोभनीय वक्तव्यही करायचं, रुपाली चाकणकरांचा चित्रा वाघ यांच्यावर घणाघात

आता नवा वसुली मंत्री कोण? अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ कडाडल्या 

चित्राताईंचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात आणि ताई विचारतायत नवा वसुली मंत्री कोण?, चाकणकरांचा पलटवार

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.