CM Eknath Shinde | पनवेलमध्ये राजकीय भूकंप, मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

मुंबईः एकिकडे उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेना पक्षावर संकटं येत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला राज्यभरातून पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्यातच एकनाथ शिंदे भाजपसोबत महायुती करत सत्तेत आल्यानंतर शिंदे गटात जोरदार इन्कमिंग सुरु आहे. शिवसेनेचे आमदार, खासदार शिंदे गटात दाखल होत आहेत तर इतर पक्षांमध्येही याचे पडसाद उमटत आहेत. मनसेचे नेतेही शिंदे […]

CM Eknath Shinde | पनवेलमध्ये राजकीय भूकंप, मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश
मनसे पदाधिकाऱ्यांचा एकनाथ शिंदे गटात प्रवेशImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 12:46 PM

मुंबईः एकिकडे उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेना पक्षावर संकटं येत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला राज्यभरातून पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्यातच एकनाथ शिंदे भाजपसोबत महायुती करत सत्तेत आल्यानंतर शिंदे गटात जोरदार इन्कमिंग सुरु आहे. शिवसेनेचे आमदार, खासदार शिंदे गटात दाखल होत आहेत तर इतर पक्षांमध्येही याचे पडसाद उमटत आहेत. मनसेचे नेतेही शिंदे गटात दाखल होत आहेत. नवी मुंबईतील पनवेल, उरण, खारघरमध्ये मनसेला खिंडार पडले आहे. येथील माजी जिल्हाध्यक्षांसह 100 जणांनी शिंदे (MNS leaders in Shinde group) गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे नवी मुंबईतील आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिंदे गटाचं बळ वाढलेलं दिसत आहे.

100 मनसे पदाधिकारी शिंदे गटात

एकनाथ शिंदे गटाने पनवेलमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खिंडार पडल्याचं चित्र आहे. पनवेल आणि उरणमधील मनसेच्या 100 पदाधिकाऱ्यांनी सोमवारी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. रात्री उशीरा मुंबईमधील मलबार हिल येथील शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यात हा पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनसेच्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. मनसेचे माजी रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत यांच्यासह माजी खारघर शहर प्रमुख प्रसाद परब हेदेखील शिंदे गटात दाखल झाले. उरण आणि पनवेलमधील मनसे खारघरची पूर्ण टीम शिंदे गटात दाखल झाल्याचं चित्र आहे.

आता शिंदे-मनसे संघर्ष पेटणार?

शिवसेनेतून वेगळा गट स्थापन करणाऱ्या एकनाथ शिंदे यांचा गेल्या महिन्यापासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी संघर्ष पेटलेला दिसून येत आहे. आता एकनाथ शिंदे गटात मनसैनिकांनी प्रवेश केल्यामुळे येत्या काळात मनसे विरुद्ध शिंदे गट असाही संघर्ष पहायला मिळू शकतो. नवी मुंबईत मागील आठ वर्षांपासून जिल्हाध्यक्ष पदावर असलेल्या अतुल भगत यांनी कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांसह शिंदे गटाला जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे मुंबईतील मनसेत असणारी अंतर्गत धुसपूस उफाळून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अतुल भगत यांच्यासोबत नवी मुंबईतील उप तालुका अध्यक्ष आणि इतर पदाधिकारीदेखील शिंदे गटात सहभागी झाले आहेत.

कुठे कुठे खिंडार?

  • ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या 67 पैकी 66 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला.
  •  नवी मुंबई पालिकेतील ३८ पैकी २८ माजी नगरसेवकांनी शिंदेंना पाठिंबा दिला.
  • नवी मुंबई पालिकेतील शिवसेनेच्या ३८ पैकी २८ नगरसेवकांनी महिनाभरापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन येथील निवासस्थानी भेट घेत त्यांना पाठिंबा दिला.
Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.