मंत्री लोढा यांचं शिवरायांबाबत वादग्रस्त विधान, चहूबाजूने टीकेची झोड, मुख्यमंत्र्यांचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले…

लोढा यांचं शिवरायांबाबत वादग्रस्त विधान, मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया...

मंत्री लोढा यांचं शिवरायांबाबत वादग्रस्त विधान, चहूबाजूने टीकेची झोड, मुख्यमंत्र्यांचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
Follow us
| Updated on: Nov 30, 2022 | 4:10 PM

मुंबई : मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha Statement) यांनी छत्रपती शिवरायांबाबत (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त विधान केलं. त्याचे सर्वत्र पडसाद पाहायला मिळत आहेत. अनेकांनी त्यांच्या या विधानाचा निषेध केलाय. याबाबत विचारलं असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान आहेत. शिवरायांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत.

लोढा यांचं विधान

औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना डांबून ठेवलं होतं पण स्वराज्यासाठी ते बाहेर पडले. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनादेखील कुणीतरी डांबून ठेवलं होतं पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले, असं मंगलप्रभात लोढा म्हणाले. त्यांच्या या विधानाचा निषेध केला जात आहे.

लोढा यांचं स्पष्टीकरण

मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली नाही. तर जो प्रसंग घडला याची तुलना केली. केवळ त्या प्रसंगातील साधर्म्य दाखवण्याचा माझा प्रयत्न होता, असं मंगलप्रभात लोढा म्हणालेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गडकरींची तुलना शिवरायांशी केली होती. त्यावरून सध्या वाद सुरु आहे. राज्यपालांना पदावरून हटवण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यासाठी आंदोलनं होतं आहेत. असं असतानाच भाजपच्या आणखी एका बड्या नेत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय.त्याचे तीव्र पडसाद उमटलेले दिसत आहेत. लोढा यांच्या या विधानावर विरोधीपक्षाकडून टीका केली जात आहे.

विरोधीपक्षाची प्रतिक्रिया

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही लोढा यांच्या विधानाचा निषेध केलाय. वाचाळवीरांना आवरा आवरा मी म्हणतोय परंतु यांच्यात चढाओढ लागली आहे की कोण जास्त वादग्रस्त विधानं करतंय. एकनाथ शिंदे स्टेजवर असताना शिवरायांचा अपमान केला जातो हे अतिशय चूक आहे, असं अजित पवार म्हणालेत.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.