AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोटे म्हणाले, स्वत:चं पोर हवं, कमरेत जोर आहे, मुख्यमंत्री म्हणतात…

अहमदनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभेने अहमदनगर महापालिका प्रचाराची सांगता झाली. गाजर दाखवत आंदोलन करणारे विरोधक आणि शिवसेनेचाही मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला आणि त्यांच्याच हातात जनतेने गाजर दिलंय असं तेम्हणाले. धुळे शहर हे माझं दत्तक शहर असल्याचं म्हटल्यानंतर त्यांच्याच पक्षातीलआमदार अनिल गोटे यांनी टोला लगावला होता. यालाही मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणेउत्तर दिलं. या सभेला जलसंधारण मंत्री राम […]

गोटे म्हणाले, स्वत:चं पोर हवं, कमरेत जोर आहे, मुख्यमंत्री म्हणतात...
| Edited By: | Updated on: Dec 07, 2020 | 11:10 PM
Share

अहमदनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभेने अहमदनगर महापालिका प्रचाराची सांगता झाली. गाजर दाखवत आंदोलन करणारे विरोधक आणि शिवसेनेचाही मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला आणि त्यांच्याच हातात जनतेने गाजर दिलंय असं तेम्हणाले. धुळे शहर हे माझं दत्तक शहर असल्याचं म्हटल्यानंतर त्यांच्याच पक्षातीलआमदार अनिल गोटे यांनी टोला लगावला होता. यालाही मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणेउत्तर दिलं. या सभेला जलसंधारण मंत्री राम शिंदेसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.  

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीचे मंत्री हे फक्त तालुक्याचे मंत्री असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. तर गाजरं वाटणारांच्या हातात जनतेने गाजरं दिल्याचा टोला शिवसेनेला लगावलाय. नगरच्या दहशतीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्थानिक शिवसेना नेतृत्वाला तंबी दिली.

मुख्यमंत्र्यांनी विकासकामांचा आढावा घेत मनपात सत्ता देण्याचं आवाहन केलं. विरोधकांचा नेहमीच्या शैलीत मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला. नगरला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते आहेत. अनेक वर्ष आघाडीच्या मंत्र्यांनी सत्ता उपभोगली, मात्र त्यांनी शहराचा कधीच विचार केला नसल्याचं म्हटलंय.

विखे, थोरात हे केवळ तालुक्याचे मंत्री आणि नेते असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. पंधरा वर्षे तुमची सत्ता असताना विकास का केला नाही, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. तर राज्यातील प्रत्येक शहर हे माझं दत्तक शहर आहे. मी दत्तक म्हटल्यावर काहींच्या पोटात दुखतं, पण दत्तक घेण्यास मनगटात जोर लागतो. मी विकास करत असल्याने माझ्यावर टीका करतात. मात्र मी टीकेला घाबरत नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

तुमचं पंधरा वर्षाचं काम आणि माझं चार वर्षे काम पाहा, असं म्हणत एका मंचावर येऊन चर्चा करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मित्र पक्ष शिवसेनेवरही निशाना साधला. त्यांच्या वागण्याने ते मित्र आहेत का, असा प्रश्न पडतोय. माझ्या सभेनंतर ते गाजरं वाटली मात्र जनतेने आम्हाला मतं दिली तर यांच्या हाती गाजरं दिल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय. त्यांची एकही जागा आली नसून आमच्यावर जनतेचा विश्वास असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

राज्यात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे सुरु आहेत. मात्र चार वर्षात सर्व कामं होऊ शकत नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. नगरला उद्योग आणण्यासाठी  प्रयत्न करतोय. मात्र विरोधकांनी इथे उद्योग आणले नाही, तर उद्योग बंद पडल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्थानिक शिवसेना नेतृत्वावरही हल्ला केला. काही जण नगरला भयमुक्त करणार असल्याचा दावा करतात, मात्र तुमचेच भय इथे असून तुमच्यापासून भयमुक्त करण्याची गरज असल्याचं म्हटलंय. झुंडशाही, गुंडशाही पाठीमागे कोण आहे याची माहिती आहे. नगरला मीच भयमुक्त करणार असून कालही केलंय, आज केलंय आणि उद्याही करेन.. कोणाचीही गय केली जाणार नाही. मी धमकी देत नाही मी कायद्याने चालतो. कायद्याचा दंडुका मजबूत आहे. बेकायदेशीर दंडुका मारल्याशिवाय राहणार नसल्याचा ईशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय.

प्रधानमंत्री आवास योजनेत 2022 पर्यंत सर्वांना घरं देणार आहोत. सहा लाख घरं देणार आहोत. आता चार लाख घरं पूर्ण झाली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.  मागाल तेवढे घरं देऊ. हे मी तुम्हाला लिहून देत असल्याचं आश्वान त्यांनी दिलं. मुख्यमंत्र्यांनी उमेदवारांनाही डोस दिलाय. तुम्ही निवडून आल्यावर टक्केवारी गोष्टी केल्या तर घरी पाठवेन, असा इशारा त्यांनी दिला.

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...