AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री फडणवीस मंत्र्यांवर नाराज, अनेकांना डच्चू मिळणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत

पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राज्यातील राजकीय वारावरणावर भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री अनेक मंत्रांवर नाराज आहेत असंही सुळे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री फडणवीस मंत्र्यांवर नाराज, अनेकांना डच्चू मिळणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत
supriya sule
| Updated on: Jul 26, 2025 | 2:56 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण खराब झालं आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानभवनात रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला होता, तेव्हापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तसेच काही मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले असल्याचेही समोर आले आहे. आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी या सर्व मुद्यांवर भाष्य केलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

मुख्यमंत्री नाराज

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘दिल्लीत राज्याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्री तीन दिवस दिल्लीत होते. मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडून जे सुरू आहे त्यावर मुख्यमंत्री प्रचंड नाराज आहेत. मित्रपक्षांवरही मुख्यमंत्री नाराज आहेत. महाराष्ट्राची प्रतिमा वाईट होईल अशी परिस्थिती सध्या आहे असं सुळे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातून काही नेत्यांना डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रमी खेळणाऱ्या मंत्र्याची देशभरात चर्चा

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दिल्लीतले खासदार मला थांबून थांबून विचारत होते की रमीचा काय प्रकार सुरू आहे? कोण आहे हा मंत्री जो रमी खेळत आहे? राज्यात कुठलीही घटना घडली की देशभरात पसरते. यामुळे राज्याची देशभरात प्रचंड बिकट अवस्था झाली आहे.

कोकाटेंनी राजीनामा द्यावा – सुळे

माणिकराव कोकाटेच्या राजीनाम्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘ज्यावेळेस पहिला व्हिडिओ समोर आला, त्यावेळी माणिकराव कोकाटे यांनी नैतिक जबाबदारी घेऊ न राजीनामा द्यायला हवा होता. यांना सांगावं लागतं की राजीनामा द्या, स्वतः राजीनामे देत नाहीत. दिल्लीने मध्यस्ती केल्याशिवाय राजीनामे होत नाहीत.’

ऑन लाडकी बहीण योजनेबाबतही भाष्य

काही ठिकाणी पुरुषांनीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पुरुषांनी फॉर्म कसे भरले, याते कॉन्टॅक्ट कोणाकडे आहे त्याची चौकशी करा. निवडणुकीच्या आधी घाईघाईने यांनी जास्ती फॉर्म भरून घेतले. यामागे मोठे षडयंत्र आहे, ज्या कंपनीने फॉर्म भरून घेतले त्यांची चौकशी करा. एसआयटी आणि ईडीच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ