'मंगलजी मैं जैसे था, वैसे ही हुं, आगे भी वैसे ही रहूंगा', मुनगंटीवारांच्या मुलीच्या रिसेप्शनमध्ये उद्धव ठाकरेंची हमी

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी काहीसं वेगळं सूचक विधान केलं आहे.

Reception of Sudhir Mungantiwar daughter, ‘मंगलजी मैं जैसे था, वैसे ही हुं, आगे भी वैसे ही रहूंगा’, मुनगंटीवारांच्या मुलीच्या रिसेप्शनमध्ये उद्धव ठाकरेंची हमी

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि शिवसेनेच्या नात्यात चांगलाच दुरावा आला. अनेक भाजप नेत्यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली, दुसरीकडे शिवसेनेकडून एकट्या संजय राऊत यांनी भाजपच्या नाकी नऊ आणले. त्यामुळे आता भाजप-शिवसेनेचं पुढील काळातील नातं शत्रुत्वाचंच राहिल, असाच अंदाज लावला जात होता. मात्र, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी काहीसं वेगळं सूचक विधान केलं (Reception of Sudhir Mungantiwar daughter).

सुधीर मुनगंटीवार यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त यावेळी आज (5 डिसेंबर) सायंकाळी आयोजित केलेल्या समारंभाला भाजपच्या अनेक नेत्यांसह इतरही पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील हजेरी लावली. मुनगंटीवारांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे परत जात असतानाच त्यांची भेट मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्याशीही झाली. यावेळी त्यांच्यात काहीसा संवादही झाला. लोढा यांची भेट होताच मुख्यमंत्री ठाकरे यांनी अत्यंत नम्रतेने लोढांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी लोढांशी केलेला सूचक संवाद सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “मंगलजी मैं जैसे था, वैसे ही हुं और आगे भी वैसे ही रहुंगा.”

उद्धव ठाकरे यांनी अगदी नम्रपणाने हे विधान केलं असलं, तरी याचे अनेक राजकीय अर्थ लावले जात आहेत. भाजप आणि शिवसेनेतील संबंध ताणले गेलेले असताना उद्धव ठाकरे यांनी मंगल प्रभात लोढांना आश्वस्त करण्यामागे नेमकं काय कारण? असा प्रश्न विचारला जात आहे. लोढा यांच्याशी झालेला हा संवाद भविष्यात होऊ घातलेल्या काही राजकीय समीकरणांची नांदी तर नाही ना, अशीही शंका उपस्थित केली जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *