उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानामागे वेगळाच डाव, नितेश राणेंनी मांडली नवी थिअरी

CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या दिशेने पाहत, “मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी”, असे म्हटले. त्यामुळे राजकीय वर्तुळात कालपासून पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीची चर्चा रंगली आहे.

उद्धव ठाकरेंच्या 'त्या' विधानामागे वेगळाच डाव, नितेश राणेंनी मांडली नवी थिअरी
नितेश राणे आणि उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 11:07 AM

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमधील कार्यक्रमात केलेल्या विधानावरुन सध्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते शुक्रवारी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची सुरुवात अनेकांना संभ्रमात टाकणारी ठरली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या दिशेने पाहत, “मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी”, असे म्हटले. त्यामुळे राजकीय वर्तुळात कालपासून पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीची चर्चा रंगली आहे.

या पार्श्वभूमीवर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर वेगळाच आरोप केला आहे. शुक्रवारी पहाटे मुंबईतील बीकेसी परिसरात निर्माणाधीन असलेल्या एका उड्डाणपुलाचा गर्डर कोसळून दुर्घटना घडली होती. यामध्ये 10 मजूर जखमी झाले होते. या दुर्घटनेवरून प्रसारमाध्यमांचे लक्ष हटवण्यासाठीच उद्धव ठाकरे यांनी भाजप-शिवसेना युतीची आशा दाखवणारे वक्तव्य केले का, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता शिवसेना यावर काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

बीकेसीत नेमकं काय घडलं होतं?

मुंबईच्या बीकेसी परिसरात शुक्रवारी पहाटे उड्डाणपूल कोसळल्याची दुर्घटना घडली. हा पूल निर्माणाधीन होता. उड्डाणपूलाचे काम सुरु असल्यामुळे नेहमीप्रमाणे काही मजूर पूलावर होते. मात्र, पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अचानक हा पूल पडायला सुरुवात झाली. हा अपघात झाला तेव्हा पूलावर तब्बल 20 ते 25 मजूर काम करत होते.

त्यावेळी या पूलाचा एक गर्डर निखळून खाली पडायला सुरुवात झाली. पूल पडायला सुरुवात झाल्यानंतर काही मजूरांना त्याचा अंदाज झाला. त्यामुळे या मजूरांनी पूलावरुन वेळीच पळ काढला. मात्र, आठ ते दहा मजूर हे पूलासोबतच खाली कोसळले. हे सर्वजण थेट बाजूच्या नाल्यात पडल्याने जखमी झाले होते. यावरुन भाजपचे नेते शिवसेनेला लक्ष्य करणार, हे अपेक्षित होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये टाकलेल्या गुगलीनंतर या घटनेचा अनेकांना विसर पडला होता.

संबंधित बातम्या:

कुणी तरी आहे तिथे, त्यांना इथे यायचे आहे, उद्धव ठाकरेंचे संकेत तेच; राऊतांनी धुरळा उडवला

मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची, शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्यांशी युती कशी होणार?; राऊतांचा सवाल

युती झाल्यास उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार?; मुख्यमंत्र्यांनी दानवेंच्या कानात काय सांगितलं?

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.