मुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरातांची तासभर बैठक, राजस्थानातील सत्तासंघर्षानंतर ठाकरे सावध

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची बैठक पार (CM Uddhav Thackeray Meet With Balasaheb Thorat) पडली.

मुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरातांची तासभर बैठक, राजस्थानातील सत्तासंघर्षानंतर ठाकरे सावध

मुंबई : राजस्थानमधील सत्तासंघर्षानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सावध पावित्रा घेतला (CM Uddhav Thackeray Meet With Balasaheb Thorat) आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र काँग्रेसची चाचपणी केली. नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांची बैठक पार पडली. शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात जवळपास तासभर बैठक झाली.

मुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरात यांच्या बैठकीला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

राजस्थानमध्ये काँग्रेस अंतर्गत सुरू असलेल्या नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची महाराष्ट्र काँग्रेसमध्ये चाचपणी सुरु केली आहे. महाविकासाआघाडी सरकारला फटका बसू नये यासाठी काँग्रेसची नाराजी दूर करण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

गेल्या आठवड्यात झालेल्या मुंबई पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रद्द करण्यावरुन वाद निर्माण झाला होता. यानंतर आधी चर्चा-मग बदल्या असे सूत्र महाविकासआघाडीत ठरले आहे.  त्यानुसार बदल्या करण्याआधी महाविकासआघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षाचे नेते चर्चा करणार आहेत.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत नाराजीचे मुद्दे मांडले होते.

यावेळी कोणताही निर्णय घेताना मुख्यमंत्री विश्वासात घेत नाहीत. हवे असलेले प्रशासकीय अधिकारी मिळत नाही अशी मागणी काँग्रेसच्या मंत्र्यांनी केली होती.  त्यामुळे लवकरच महसूल खात्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अपेक्षित असल्याचे बोललं जात आहे. (CM Uddhav Thackeray Meet With Balasaheb Thorat)

संबंधित बातम्या : 

Rajasthan Political Crisis LIVE | गहलोत यांच्याकडे 84 आमदारांचंच बळ, पायलट गटाचा दावा

विकास करेल त्याला किडनी, भुसावळच्या भाजप नगरसेवकाची खुली ऑफर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *