मित्राने मला समजावं, म्हणून अर्थसंकल्पावर सोप्या भाषेत पुस्तक लिहिलं : उद्धव ठाकरे

देवेंद्रजी मी कधी विचार केला नव्हता की, अशा कुठल्या विषयावर मला भाषण करावं लागेल. पण हा प्रसंग माझ्यावर  तुमच्यामुळे आला.

मित्राने मला समजावं, म्हणून अर्थसंकल्पावर सोप्या भाषेत पुस्तक लिहिलं : उद्धव ठाकरे

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Uddhav Tthackeray On Fadnavis Book) यांनी लिहिलेल्या अर्थसंकल्प सोप्या भाषेत (Arthasankalp Sopya Bhashet) या पुस्तकाचे नुकतंच उद्धाटन करण्यात  आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री आजित पवार यांच्या हस्ते या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या या पुस्तकाबाबत त्यांचे मत व्यक्त केले.

“देवेंद्रजी मी कधी विचार केला नव्हता की, अशा कुठल्या विषयावर मला भाषण करावं लागेल. पण हा प्रसंग माझ्यावर  तुमच्यामुळे (Uddhav Tthackeray On Fadnavis Book) आला. मित्र आशिष शेलार म्हणतात ते बरोबर आहे, आमची मैत्री आहेच आणि माझं काम सोपं कसं व्हावं, केवळ मला कळावा म्हणून ‘अर्थसंकल्प : सोप्या भाषेत’ हे पुस्तक देवेंद्रजींनी लिहिलं आहे. नाहीतर आजपर्यंत तुम्ही इतके अर्थसंकल्प पाहिलेत, मात्र त्यावर पुस्तक कधी लिहिलं नव्हतं”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान म्हणाले.

हेही वाचा : गळ्याची आण खरं सांगतो, सगळ्यात जास्त आनंद मुनगंटीवारांना होईल : अजित पवार

“आज मला अर्थसंकल्प सोप्या भाषेत कसा बोलावा, वाचावा, अर्थसंकल्प कसा अंमलात आणावा याचंही उत्तम उदाहरण मिळालं. देवेंद्रजी तुम्ही हे पुस्तक लिहिलं, तरीही तुम्ही इथे पाहुणे म्हणून आलात, म्हणजे आपला कार्यक्रम सुद्धा दुसऱ्यांच्या खर्चाने कसा करावा”, असं म्हणता म्हणता मुख्यमंत्री थांबले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

पुढे मुख्यमंत्री म्हणाले, “यशस्वी अर्थमंत्री तोच ज्याच्या अर्थसंकल्प मांडणीतून लोकांना हे कळतच नाही की, आपला कोणता खिसा कापला गेला. पण तसा माझा नवीन मित्र नाही (अजित पवार). मला खात्री आहे की, ज्या जनतेच्या खिशावर आपला अर्थसंकल्प अवलंबून असतो. त्या जनतेच्या खिशात भर कशी घालावी, हा सुद्ध अर्थसंकल्प मांडणाऱ्याचा एक मोठा विषय असतो”, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा :  अजित पवारांनी बासनात गुंडाळलेल्या ‘हायपरलूप’साठी एकनाथ शिंदे आग्रही

“देवेंद्रजी आमच्या पहिल्या अर्थसंकल्पाआधीच तुम्ही अर्थसंकल्पावर पुस्तक लिहिलं. पुढची पाच-दहा वर्ष अशीच पुस्तकं आमच्या अर्थसंकल्पावर लिहित राहा, म्हणजे आम्हालाही कळेल की, आमच्या अर्थसंकल्पामध्ये उणिवा काय राहिल्या. त्या उणिवा सुधारत सुधारत आम्ही सुद्धा पुढे जात राहू.”

“मी मनापासून सांगतो मस्करी करत नाही की, हे पुस्तक सर्वात पहिले मीच वाचणार आहे. कारण आपण जो काही अर्थसंकल्प मांडतो, हा सगळा पैसा हा सर्वसामान्याचा असतो आणि सर्व सामान्याला साध्या सोप्या भाषेत कळलं पाहिजे की, माझ्या पैशाचा उपयोग तुम्ही माझ्यासाठी कसा करत आहात. मी कर भरतो आहे, या कराचा माझ्यासाठी काय उपयोग केला जात आहे, काय कमी होणार आहे, काय वाढणार आहे”, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांचं कौतुक केलं.

हेही वाचा : फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपप्रवेश, चंद्रकांत पाटलांकडून हकालपट्टी

तसेच, तर नोटाबंदी हा विषय अर्थसंकल्पात यायला हवा होता की नव्हता?, असा प्रश्नही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. “जर अनेक बारीक सारीक गोष्टी आपण अर्थसंकल्पात मांडत असू, तर नोटाबंदी हा विषय अर्थसंकल्पात यायला हवा होता की नव्हता? याबाबत मला माहित नाही, मात्र असे सर्व किचकट विषय आहेत. जे सोप्या भाषेत कुणीतरी सांगायला हवे होते आणि ते काम देवेंद्र तुम्ही केलेलं आहात. म्हणून मनापासून तुमचं अभिनंदन आणि भावी पुस्तकांसाठी तुम्हाला (Uddhav Tthackeray On Fadnavis Book) शुभेच्छा”, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *