AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गळ्याची आण खरं सांगतो, सगळ्यात जास्त आनंद मुनगंटीवारांना होईल : अजित पवार

तुमच्या सर्वांच्या भावी वाटचालीसाठी अतिशय उपयुक्त ठरेल," असेही अजित पवारांनी यावेळी (Ajit Pawar on Fadnavis book) म्हटलं. 

गळ्याची आण खरं सांगतो, सगळ्यात जास्त आनंद मुनगंटीवारांना होईल : अजित पवार
| Updated on: Mar 04, 2020 | 7:02 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Ajit Pawar on Fadnavis book) यांनी लिहिलेल्या अर्थसंकल्प सोप्या भाषेत या पुस्तकाचे नुकतंच उद्धाटन करण्यात  आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री आजित पवार यांच्या हस्ते या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला भाजपसह, महाविकासआघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणादरम्यान चिमटे काढले.

“मला आठवतं आहे, 6 वर्षांपूर्वी मी राज्याचा (Ajit Pawar on Fadnavis book) अर्थमंत्री म्हणून पहिला अर्थसंकल्प सभागृहात सादर करत असताना सगळे विरोधक आमदार गोंधळ घालत होते. अर्थसंकल्प कोणालाही ऐकू जात नव्हता. त्या गोंधळातही माझ्या समोरच्या बाकावरील एक सदस्य गोंधळ न घालता कानाला एअरफोन लावून, बाकावर डोकं ठेवून अर्थसंकल्प ऐकण्याचा, समजून घेण्याचा, त्यातील मुद्दे टिपून ते लिहून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होते. ते सदस्य हे देवेंद्र फडणवीस होते,” अशी आठवण अजित पवारांनी सांगितली.

फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपप्रवेश, चंद्रकांत पाटलांकडून हकालपट्टी

“मला इतकं वाईट वाटत होतं की, हे इतकं बारकाईने ऐकतात यांनी थोडसं भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांना समजून सांगायला काय हरकत नाही. हे समजून ऐकत होते. तसे तसे मुनगंटीवार जोरजोरात घोषणा देत होते. गिरीश महाजन तर विचारुच नका. मुनगंटीवारांच गिरीश महाजनांच चाललं होतं. पण त्यांना काय माहिती होतं की, पुढे जाऊन हाच मुख्यमंत्री होणार आहे आणि याच्याच हाताखाली काम करायचं आहे.”

“त्यांचं हे पुस्तक बघितल्यानंतर देवेंद्रजी तुम्ही उत्तम साहित्यिक होऊ शकता असं मला जाणवायला लागलं आहे. त्यामुळे राजकारण सोडून लेखक व्हायला काही हरकत नाही, असे मला वाटतं.” असेही अजित पवार म्हणाले.

“आम्हाला पण जरा सुगीचे दिवस येतील. आमचं पण जरा बरं चालेल. भाजप नेते राम नाईक तुम्हीही या कार्यक्रमाला हजर आहात. तुम्ही जरा वर दिल्लीला सांगितलं की हे साहित्यिक आहे, यांना बरंच ज्ञान आहे, आता ज्ञानाचा आपण दिल्लीत वापर करुन घेऊ. तर सर्व आमच्या महाराष्ट्राच्या 288 आणि खालच्या सभागृहाची एकमताने मान्यता राहील. त्यात सर्वात आनंदित सुधीर मुनगंटीवार होतील. गळ्याची आण खोटं बोलतं नाही,” असा चिमटाही अजित पवारांनी काढला.

देवेंद्र फडणवीसांना सुप्रीम कोर्टाचा धक्का, प्रतिज्ञापत्रात गुन्हे लपवल्याप्रकरणी खटला चालणार

“गमतीचा भाग जाऊ द्या. पण अर्थसंकल्पावर पुस्तक लिहिल्याबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो आणि मनापासून कौतुक करतो आणि खरोखर यंदाच्या पहिल्या टर्ममधील सर्व सदस्यांनी अर्थसंकल्प सोप्या भाषेत हे पुस्तक विरोधी पक्षनेत्यांनी लिहिलं आहे. त्याचं जरुर वाचन करावं. तुमच्या सर्वांच्या भावी वाटचालीसाठी अतिशय उपयुक्त ठरेल,” असेही अजित पवारांनी यावेळी (Ajit Pawar on Fadnavis book) म्हटलं.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.