मुख्यमंत्री पदावरून प्रमोद सावंत, विश्वजीत राणेंमध्ये शीतयुद्ध; जाहिरातीतून सावंतांचा फोटो गायब

गोव्यातील भाजपासमोर आता एक नवा पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री पदावरून डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) आणि विश्वजीत राणे यांच्यात शीत युद्ध सुरू झाले आहे. त्याची झलक आज पुन्हा एकदा पहायला मिळाली आहे. स्थानिक वृत्तपत्रात विश्वजीत राणे यांची पत्नी डॉ दिव्या राणे यांनी आज दिलेल्या जाहिरातीत डॉ. प्रमोद सावंत यांचे छायाचित्र छापण्यात आले नाही.

मुख्यमंत्री पदावरून प्रमोद सावंत, विश्वजीत राणेंमध्ये शीतयुद्ध; जाहिरातीतून सावंतांचा फोटो गायब
प्रमोद सावंतImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 2:19 PM

पणजी : गोव्यामध्ये भाजपाने (bjp) आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळवले आहे. गोव्यात (Goa) विधानसभेच्या चाळीस जागांपैकी वीस जागांवर भाजपाने विजय मिळवला आहे. बुहमतासाठी एक जागा कमी आहे. मात्र निवडूण आलेल्या अपक्ष उमेदवारांनी देखील भाजपाला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता गोव्यात भाजपाचाच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र गोव्यातील भाजपासमोर आता एक नवा पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री पदावरून डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) आणि विश्वजीत राणे यांच्यात शीत युद्ध सुरू झाले आहे. त्याची झलक आज पुन्हा एकदा पहायला मिळाली आहे. स्थानिक वृत्तपत्रात विश्वजीत राणे यांची पत्नी डॉ दिव्या राणे यांनी आज दिलेल्या जाहिरातीत डॉ. प्रमोद सावंत यांचे छायाचित्र छापण्यात आलेले नाही. या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस, त्याचप्रमाणे प्रभारी सी. टी. रवी, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची छायाचित्रे छापण्यात आली आहेत. मात्र ज्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात निवडणूक लढवली गेली त्या मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांचे छायाचित्र जाहिरातीत नाही. यावरून प्रमोद सावंत आणि राणे यांच्यामधील शीत युद्ध पुन्हा एकदा समोर आले आहे.

नव्या वादाची शक्यता

डॉ. दिव्या राणे यांनी त्यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल आज स्थानिक वृत्तपत्रात पहिल्या पानावर जाहिरात दिली आहे. पर्यें विधानसभा मतदार संघातून डॉ. दिव्या राणे या 13,943 मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. त्यांनी आपल्या या विजयाबद्दल एका स्थानिक वृत्तपत्राला जाहिरात दिली. या जाहिरातीलध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस, त्याचप्रमाणे प्रभारी सी. टी. रवी, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची छायाचित्रे छापण्यात आली आहेत. मात्र ज्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात निवडणूक लढवली गेली त्या मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांचे छायाचित्र जाहिरातीत नाही. यावरू आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

राणेंनी घेतली राज्यपालांची भेट

दरम्यान त्यापूर्वी विश्वजीत राणे यांनी काल अचानक स्वतंत्रपणे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांची राजभवनात भेट घेतल्याने, गोव्याच्या राजकारणात खळबळ माजली होती. राज्यपालांना आपल्या मतदार संघातील कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी भेटल्याचा खुलासा त्यावर विश्वजीत राणे यांनी केला होता. सत्तास्थापनेसाठी भाजपच्या केंद्रीय स्तरावरून राज्यातील नेत्यांना अद्याप कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत, तसेच सत्ता स्थापनेसाठी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा पाठिंबा घेण्याबाबतही भाजपामध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे.

संबंधित बातम्या

केंद्रीय तपास यंत्रणेकरवी थेट कारवाई करता, मग इथे पोलिसांनी साधी माहितीही घ्यायची नाही का, भुजबळांचा सवाल

प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आसनसोलमधून पोटनिवडणूक लढणार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा

फडणवीस पुरून उरतील, ते किती तरी ठाकरे-पवार खिशात घालून फिरतात; निलेश राणेंचा हल्लाबोल

TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.