AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत काँग्रेसला ‘शिकार’ होण्याची भीती? स्वबळाच्या नाऱ्यानंतर आता शिवसेनेसोबत ‘त्या’ कराराची मागणी, आघाडी काय करणार?

मुंबई महापालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीत महाविकास आघाडीची युती कायम राहणार का? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी काँग्रेसने केली होती.

मुंबईत काँग्रेसला 'शिकार' होण्याची भीती? स्वबळाच्या नाऱ्यानंतर आता शिवसेनेसोबत 'त्या' कराराची मागणी, आघाडी काय करणार?
भाई जगताप, मुंबई काँग्रेस अध्यक्ष
| Edited By: | Updated on: Nov 25, 2021 | 9:51 AM
Share

मुंबई – मुंबई महापालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीत महाविकास आघाडीची युती कायम राहणार का? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी काँग्रेसने केली होती. परंतु आता आघाडीचे संकेत मिळत आहेत. मात्र आघाडी झाल्यास आपले उमेदवार दोनही घटक पक्षांकडून पळवले जातील, अशी भीती काँग्रेसला वाटत आहे. त्यामुळेच आघाडी झाल्यास आमच्या एकाही उमेदवाराला तुम्ही पक्षात प्रवेश देणार नाहीत, किंवा आयारामांना तिकीट मिळू नये असा करार करण्याची मागणी काँग्रेसने शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे केली आहे.

…तर आम्ही आघाडीमध्ये सहभागी होणार

मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाला रोखायचे असल्यास महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षाने एकत्र येण्याची गरज आहे. काँग्रेसने स्वबळाचा निर्णय घेतला आहे. मात्र जर जागा वाटपात अन्याय होणार नसेल, सन्मानाने जागा मिळणार असतील तर काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत युती करण्यास तयार आहे. मात्र जागा वाटपात अन्याय होणार असेल तर  आम्ही स्वबळावर निवडणूक लढू शकतो, असा इशारा काँग्रेसच्या काही नेत्यांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडी करणार का हे पहाणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

‘शिवसेनेसोबत आघाडी करण्यास उत्सूक नाही’ 

दुसरीकडे महापालिका निवडणुकीत काँग्रेस शिवसेनेसोबत आघाडी करणार का, या प्रश्नाला उत्तर देताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी म्हटले आहे की, मी वैयक्तीक पातळीवर शिवसेनेसोबत युती करण्यास उत्सुक नाही. शिवसेनेची आणि काँग्रेसची कार्यपद्धत ही पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे पुढे चालून मतभेद होऊ शकतात. मात्र आघाडीबाबत अंतिम निर्णय हा पक्षाचा असेल.

जास्तीत जास्त जागा पदराद पाडून घेण्याचा प्रयत्न

दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत युती करण्याची दाट शक्यता असल्याचे राजकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे. मात्र युती करत असताना अधिकाधिक जागा आपल्या पदरात कशा पाडून घेता येतील यावर काँग्रेसचा भर असेल. त्यासाठी ते स्वबळाच्या अस्त्राचा उपयोग करू शकतात. दुसरीकडे शिवसेनेने महापालिका निवडणूक स्वबळावर लढवल्यास त्यांच्या पुढे भाजपाचे प्रमुख आव्हान असेल. अशा परिस्थितीमध्ये त्यांना फटका बसू शकतो, त्यामुळे ते आघाडी करण्यासाठी उत्सूक असतील. किंवा शेवटपर्यंत आघाडी झालीच नाही, तर सर्व पक्षा स्वबळावर लढून निवडूण आल्यानंतर पुन्हा एकत्र येऊ शकतात असा अंदाज राजकीय वर्तृळातून व्यक्त केला जात आहे.

आघाडी झाल्यास उमेदवारांची नाराजी दूर करण्याचे आव्हाण 

मुंबई महापालिकेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी झाल्यास जे उमेदवार तिकिटाच्या प्रतिक्षेत आहेत, त्यांच्या नाराजीचा फटका  आघाडीला बसू शकतो. त्यामुळे अशा नाराज कार्यकर्त्यांची समजून घालण्याचे मोठे आव्हान तीनही घटक पक्षांपुढे असणार आहे. तर दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर ऐनवेळी इतर पक्षातून भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या उमेदवाराला तिकिट मिळण्याची दाट शक्यता आहे.

संबंधित बातम्या 

ममता बॅनर्जींचा पॉलिटिकल स्ट्राईक, काँग्रेसचे 12 आमदार तृणमूलमध्ये, मेघालयात TMC प्रमुख विरोधी पक्ष

Election 2022: भाजप 26 नोव्हेंबरपासून देशभर संविधान गौरव अभियान राबवणार

ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार, राजकीय चर्चांना उधाण

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.