भास्कर जाधवांच्या सुस्साट गाडीला बाळासाहेब थोरातांचा ब्रेक, म्हणाले, ‘काँग्रेसमध्येही असे अनेक भास्कर जाधव!’

भाजपचे 12 आमदार निलंबित करुन चर्चेत आलेल्या भास्कर जाधवांची (Bhaskar Jadhav) गाडी गेली अनेक सुस्साट होती. त्यांच्या गाडीला आता काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thorat) ब्रेक लावला आहे.

भास्कर जाधवांच्या सुस्साट गाडीला बाळासाहेब थोरातांचा ब्रेक, म्हणाले, 'काँग्रेसमध्येही असे अनेक भास्कर जाधव!'
बाळासाहेब थोरात आणि भास्कर जाधव
Follow us
| Updated on: Jul 11, 2021 | 8:07 AM

अहमदनगर : अधिवेशनदरम्यान भाजपचे 12 आमदार निलंबित करुन चर्चेत आलेल्या भास्कर जाधवांची (Bhaskar Jadhav) गाडी गेली अनेक सुस्साट होती. त्यांच्या गाडीला आता काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thorat) ब्रेक लावला आहे. शिवसेनेकडे विधानसभेचं अध्यक्षपद हवं आणि त्यासाठी उद्धव ठाकरेंनी मंत्रिपदाचा देखील बळी देऊ नये, अशी चतूर भूमिका भास्कर जाधवांनी मांडली होती. तसंच मी विधानसभेचं अध्यक्ष व्हावं, अशी चर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आहे, असा दावा त्यांनी केला. त्यावर राजकारण कोळून प्यायलेल्या बाळासाहेब थोरातांनी एकाच वाक्यात जाधवांच्या सुस्साट गाडीला ब्रेक लावला. ‘काँग्रेसमध्येही असे अनेक भास्कर जाधव आहेत’, असं म्हणत त्यांनी जाधवांच्या अध्यक्षपदाची शक्यता उडवून लावली. (Congress balasaheb thorat taunt Shivsena Bhaskar Jadhav over Maharashtra Assembly Speaker)

‘आमच्याकडेही अनेक भास्कर जाधव आहेत…!’

“महाराष्ट्र विधीमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनादरम्यान तालिका अध्यक्ष म्हणून शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी उत्तम कामगिरी बजावली. पण म्हणून हे पद शिवसेनेला देण्यासंबंधित कोणताही विचार नाही किंवा चर्चाही नाही. आमच्याकडेही अनेक भास्कर जाधव आहेत”, असं मत व्यक्त करून विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहणार असल्याची ठाम भूमिका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली आहे.

जाधवांना अध्यक्षपद? ‘आमच्यात तशी चर्चा नाही!’

शनिवारी थोरात नगर दौऱ्यावर होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विधानसभा अध्यक्ष पदावरुन थोरात यांना प्रश्न विचारला. यावेळी भास्कर जाधव यांचं म्हणणं खोडून काढत, “त्यांनी कामगिरी चांगली केली परंतु काँग्रेसकडेही असे भास्कर जाधव आहेत… जाधवांना अध्यक्षपद देण्यासंबंधी कोणताही विचार झालेला, आमची तशी चर्चाही झाला नाही”, असं म्हणत त्यांनी जाधवांचा दावा खोडून काढला.

सत्तावाटपात काँग्रेसकडे अध्यक्षपद

“आमच्या पक्षात सक्षमपणे काम करु शकणारे नेते आहेत. शिवाय सत्ता वाटपात विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे आलेलं आहे. आता याच्यामध्ये बदल करण्यासंबंधी आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झालेली नाही. या अधिवेशनात अध्यक्षपदाची निवड होऊ शकलेली नाही… यासाठी बरीच मोठी प्रक्रिया आहे… कोरोनाचं वातावरण निवळल्यानंतर ही निवडणूक घ्यावी लागणार आहे”, असंही थोरात म्हणाले.

नेमकं काय म्हणाले होते भास्कर जाधव?

शिवसेनेकडे असलेले मंत्रीपद शिवसेनेकडे राहून मला विधानसभा अध्यक्ष पद मिळाले तर त्याचा मला आनंद होईल. विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेकडे द्यावं, अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे आणि त्याचं माझ्या नावावर एकमत झाल्याचं देखील मला समजलं आहे. विधानसभा अध्यक्षपद भास्कर जाधवांना दिलं तर जबाबदारीने ते सांभाळू शकतील, अशी नेत्यांमध्ये चर्चा आहे, असा दावा भास्कर जाधव यांनी केला होता.

(Congress balasaheb thorat taunt Shivsena Bhaskar Jadhav over Maharashtra Assembly Speaker)

हे ही वाचा :

मंत्रिपद आणि अध्यक्षपद सेनेकडे रहावं, काँग्रेस राष्ट्रवादीला माझी विनंती, मी अध्यक्ष झालो तर आनंदच, फायरब्रँड भास्कर जाधवांची रोखठोक मतं

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.