माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटलांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटलांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

सांगली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री आणि माजी खासदार प्रतीक पाटील यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. “मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत आहे. मी काँग्रेस पक्षाशी माझं नात तोडलं आहे. वसंतदादाचे नाव हाच माझा पक्ष आहे”, असे सांगत प्रतीक पाटीलांनी काँग्रेसला राम-राम ठोकला आहे.

“आत्ताची काँग्रेस ही इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची राहिली आहे का?”, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

“दिल्लीत जाऊन आम्ही लढायला तयार होतो. मात्र, आमच्याकडे पैसे नाहीत असं सांगितलं. त्यानंतर काँग्रेसने लगेच राजू शेट्टी यांना हा मतदारसंघ घ्या असं सांगितलं. सुरुवातीला राजू शेट्टी यांनी हा मतदारसंघ नको असं सांगितलं होतं”, असेही ते म्हणाले.

“सुरुवातीला लोकसभेसाठी विशाल पाटील आणि विधानसभेसाठी जयश्री पाटील यांच्या नावावर एकमत झालं होतं. मात्र, दिल्लीत काही नेत्यांनी लोकसभा आणि विधानसभा दोन्ही जागा वसंतदादा घराण्यात का असा सवाल उपस्थित केला. सांगली मतदारसंघ हा काँग्रेसकडे राहावा अशी सोनिया गांधी यांचीही इच्छा आहे. त्यांनी तसा निरोपही दिला. मात्र, त्यांच्या निरोपाचा अनुकूल प्रतिसाद मिळाला नाही”, असे म्हणत राज्यातील काँग्रेस नेत्यांवर माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी निशाणा साधला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *