AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सचिनपासून कोहलीपर्यंत शेतकरी आंदोलनावर क्रिकेटपटूंचे ट्विटस् कसे? काँग्रेस नेता म्हणतो, ‘हे तर बीसीसीआयचे काम!’

भारतीय क्रिकेटपटूंनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ट्विट करत सरकारधार्जिणी मतं मांडली आहेत, अशा आशयाचा आरोप काँग्रेस नेते कीर्ती चिदंबरम यांनी केलाय. | Congress Karti Chidambaram Slam BCCI Over Cricketers tweet Farmer Protest

सचिनपासून कोहलीपर्यंत शेतकरी आंदोलनावर क्रिकेटपटूंचे ट्विटस् कसे? काँग्रेस नेता म्हणतो, 'हे तर बीसीसीआयचे काम!'
farmers-protest-photo
| Updated on: Feb 04, 2021 | 7:37 AM
Share

मुंबई :  दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरुन (Farmers Protest) पॉपस्टार रिहाना (Rihaana) , ग्रेटा थनबर्ग (Greta Therburg) आणि मिया खलीफा (Mia Khalifa) यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. त्यानंतर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने (Sachin tendulkar) ट्विट करत ‘भारतासाठी काय चांगलं आहे, हे येथील नागरिकांना कळतं’, अशा शब्दात त्यांना फटकारलं. तसंच गौतम गंभीरनेही (gautam Gambhir) मोदींवर टीका करणाऱ्या परदेशी सेलिब्रेटींना धारेवर धरलं. विराट कोहली (Virat Kohli), कुंबळे (Anil Kumble), धवन (Shikhar Dhawan), रैनाने (Suresh Raina) ट्विट करत शेतकरी आंदोलनावर (Farmer protest) आपली मतं मांडली आहेत. आता या सगळ्यावर आक्षेप घेत सचिनपासून कोहलीपर्यंत शेतकरी आंदोलनावर क्रिकेटपटूंचे ट्विटस् कसे? , असा सवाल करत यापाठीमागे बीसीसीआय असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम (karti Chidambaram) यांनी केला आहे. (Congress Karti Chidambaram Slam BCCI Over Cricketers tweet Farmer Protest)

कार्ती चिदंबरम हे देशाचे माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र आहेत. बीसीसीआय आपल्या क्रिकेटपटूंना जबरदस्तीने शेतकरी आंदोलनावर ट्विट करायला लावत आहे. हे खूपच बालीश आहे. बीसीसीआयने हे थांबवायला हवं किंबहुना असं करु नये, असं कीर्ती चिदंबरम यांनी म्हटलंय.

दुसऱ्यांनी हस्तक्षेप करु नये- सचिन तेंडुलकर

भारताच्या सार्वभौत्माविषयी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. भारतामधील घडामोडींबाबत देशाबाहेरील लोक प्रेक्षक असू शकतात, पण त्यांनी हस्तक्षेप करता कामा नये. भारतासाठी काय चांगलं आहे, हे येथील नागरिकांना कळतं आणि ती गोष्ट त्यांनीच ठरवावी. देश हा एकसंध राहिला पाहिजे, असे ट्विट सचिन तेंडुलकर याने केले आहे.

शेतकरी देशाचा अविभाज्य घटक, मार्ग निघेल- विराट कोहली

मतभेदांच्या या काळात आपण संघटित राहूयात. शेतकरी हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे. मला खात्री आहे की दोन्ही बाजूंनी योग्य मार्ग लवकरच निघेल, असं ट्विट विराटने केलं आहे.

भारत आपले अंतर्गत प्रश्न शांतपणे सोडवू शकतो- अनिल कुंबळे

जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून, भारत आपले अंतर्गत प्रश्न शांतपणे सोडवू शकतो आहे, असं मत मांडत अप्रत्यक्षपणे कुंबळेने मोदी विरोधकांवर निशाणा साधलाय.

निष्कर्षापर्यंत पोहोचणं गरजेचं- शिखर धवन

सलामीवीर शिखर धवनने ट्विट करत म्हटलं आहे, “एका निष्कर्षापर्यंत पोहोचणं सध्या आपल्यासाठी खूपच आवश्यक आहे. उद्याच्या भविष्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र असायला हवं.

… याचा अर्थ असा होत नाही की बाहेरच्यांनी हस्तक्षेप करावा- सुरेश रैना

देशात काही समस्या असतात. ज्या समस्यांची उत्तरे आज उद्या मिळू शकतात. परंतु याचा अर्थ असा होत नाही की बाहेरच्यांनी हस्तक्षेप करावा, अशा शब्दात रैनाने परदेशी सेलिब्रेटींना फटकारलं आहे.

(Congress Karti Chidambaram Slam BCCI Over Cricketers tweet Farmer Protest)

हे ही वाचा :

Farmer Protest: भारतासाठी काय चांगलं हे आम्हाला कळतं, बाहेरच्यांनी नाक खुपसू नये: सचिन तेंडुलकर

जगप्रसिद्ध पॉपस्टारच्या ट्विटला उत्तर देताना कंगना म्हणते, आंदोलन करणारे शेतकरी नाहीत तर दहशतवादी !

जगजाहीर नशा केली, न्यूड फोटो शूट केले, वादात अडकली, आता शेतकऱ्यांसाठी मैदानात, कोण आहे रिहाना?

सकाळी पॉपस्टार, आता पॉर्नस्टार, मिया खलिफा शेतकऱ्यांसाठी मैदानात, कोण आहे मिया?

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.