Prithviraj Chavan | चीनच्या पंतप्रधानांना मोदी 19 वेळा भेटले, काय निष्पन्न झाले? : पृथ्वीराज चव्हाण

नरेंद्र मोदींच्या वैयक्तिक मैत्रीवर पररराष्ट्र धोरण ठरत नाही, हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे" असा घणाघात पृथ्वीबाबांनी केला. (Prithviraj Chavan Questions Modi Government)

Prithviraj Chavan | चीनच्या पंतप्रधानांना मोदी 19 वेळा भेटले, काय निष्पन्न झाले? : पृथ्वीराज चव्हाण

सातारा : “चीनच्या पंतप्रधानांना नरेंद्र मोदी 19 वेळा भेटले, पण यातून काय निष्पन्न झाले?” असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात साताऱ्यात चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसने आंदोलन केले. (Prithviraj Chavan Questions Modi Government)

साताऱ्यातील काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. आंदोलनात विश्वजित कदम यांच्यासह जिल्हयातील काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका करत पेट्रोल आणि डिझेल करवाढ म्हणजे ‘जिझिया कर’ असल्याचा टोला लगावला.

“केंद्र सरकार हे दिशाहीन आणि हातपाय गळालेले सरकार आहे. नरेंद्र मोदींच्या वैयक्तिक मैत्रीवर पररराष्ट्र धोरण ठरत नाही, हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे” असा घणाघात पृथ्वीबाबांनी केला.

हेही वाचा : “वा रे मोदी तेरा खेल…” इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक, देशभरात आंदोलन

स्वतःच्या शपथ विधीला मोदींनी इतर राष्ट्रांच्या प्रमुखांना बोलावलं, म्हणून आपण मोठं काम करतोय असे होत नाही. भारताच्या इतिहासात चीनच्या पंतप्रधानांना मोदी 19 वेळा भेटले, पण यातून काही निष्पन्न झाले का? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने मोदी सरकार विरोधात ‘स्पीक अप इंडिया’ हे देशव्यापी आंदोलन सुरु केले आहे. राजधानी दिल्लीपासून मुंबई, पुणे, सातारा, अमरावतीत आंदोलन करण्यात आले. राज्याच्या विविध भागात काँग्रेसच्या दिग्गज नेते-मंत्र्यांच्या नेतृत्वात आंदोलन छेडण्यात आले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात पुण्यात सहभागी झाले होते. “वाह रे मोदी तेरा खेल, सस्ती दारु मेहंगा पेट्रोल” असा फलक हाती घेत त्यांनी नारेबाजी केली.

इंधन दरवाढ कायम

सलग 21 दिवस सुरु असलेली इंधन दरवाढ केवळ रविवारच्या दिवशी थांबली होती, मात्र सोमवारचा दिवस उजाडताच ही घोडदौड पुन्हा सुरु झाली आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव मुंबई-दिल्लीसह देशाच्या बहुतांश भागात पुन्हा वाढले आहेत. मुंबईत पेट्रोल 87.17 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 78.81 रुपये प्रतिलिटर दर आहे. पेट्रोल 5 पैसे प्रतिलिटर, तर डिझेल 12 पैसे प्रतिलिटर महाग झाले आहे.

(Prithviraj Chavan Questions Modi Government)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *