जिंकलोच असतो… पण पनवतीने हरवलं; राहुल गांधी यांची पंतप्रधानांवर टीका

राजस्थानच्या निवडणुकीत आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांनी तर एकमेकांवर आरोपांची राळ उठवली आहे. त्यामुळे मतदारांची चांगलीच करमणूक होत आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी अत्यंत खालची पातळी गाठत एकमेकांवर टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तर थेट नरेंद्र मोदी यांना पनवती म्हटलं आहे. तर भाजपने राहुल गांधींच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे.

जिंकलोच असतो... पण पनवतीने हरवलं; राहुल गांधी यांची पंतप्रधानांवर टीका
Rahul GandhiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 21, 2023 | 7:22 PM

जयपूर | 21 नोव्हेंबर 2023 : राजस्थान विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. निवडणुकीत सर्वच पक्षांकडून एकमेकांवर आरोपप्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही जालोरमध्ये मोठी रॅली केली. यावेळी त्यांनी वर्ल्ड कप सामन्याचा उल्लेख करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. काहीही असेल आपली टीम जिंकली असती. पण पनवतीने पराभूत केलं, अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली आहे, राहुल गांधी यांच्या टीकेवर भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे. राहुल यांनी जाहीरपणे माफी मागावी अशी मागणी भाजपने केली आहे.

जालोर येथे एका प्रचंड सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे. राहुल गांधी यांचं भाषण सुरू होताच सभेला आलेल्या लोकांनी पनवती… पनवती अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावर राहुल गांधी यांनी हे उद्गार काढले. बरं वाईट काही का असेना आपली टीम जिंकली असती. पण पनवतीने पराभूत केलं. टीव्हीवाले हे बोलणार नाही. पण जनतेला सर्व माहीत आहे, असं राहुल गांधी म्हणाले. त्यानंतर राहुल गांधी यांनी मोदींच्या नावाचा उल्लेख करत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

आधीच जायचं ना

राहुल गांधी यांनी एकप्रकारे टीम इंडियाच्या पराभवाचं खापर राहुल गांधी यांच्यावर फोडलं आहे. मोदींना स्टेडियममध्ये पाहून आपले खेळाडू दबावाखाली आले. त्यामुळे आपण पराभूत झालो. कारण खेळाडू तणावाखाली होते. तेच पराभवाचं एकमेव कारण आहे. त्यांना खेळाडूंचं मनोबलच वाढवायचं होतं तर वर्ल्डकपपूर्वीच खेळाडूंना भेटायचं होतं. अंतिम सामना पाहायला जाण्याची काहीच गरज नव्हती, असंही राहुल गांधी यांनी म्हटलंय.

पनवती शब्द चर्चेत कसा?

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा पराभव झाला. त्यामुळे त्याच दिवशी अचानक पनवती हा शब्द ट्विटरवर ट्रेंड करत होता. त्यामुळे विरोधकांनीही त्याचा आधार घेत पंतप्रधानांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मोदी स्वत: मोदी स्टेडियममध्ये आल्यामुळे टीम इंडिया पराभूत झाल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे.

Non Stop LIVE Update
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला.
भाजप म्हणतय देशद्रोही, तेच सत्ताधाऱ्यांचे सहकारी? सकाळी सवाल नंतर बवाल
भाजप म्हणतय देशद्रोही, तेच सत्ताधाऱ्यांचे सहकारी? सकाळी सवाल नंतर बवाल.
मराठा आरक्षण मिळणार की नाही? कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार
मराठा आरक्षण मिळणार की नाही? कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार.
नवाब मलिक आजही सत्ताधारी बाकावरच; फडणवीस यांचा लेटर बॉम्ब निकामी?
नवाब मलिक आजही सत्ताधारी बाकावरच; फडणवीस यांचा लेटर बॉम्ब निकामी?.
... अन् अजितदादा भडकले; फडणवीसांच्या 'त्या' पत्रावर नेमकं काय म्हणाले?
... अन् अजितदादा भडकले; फडणवीसांच्या 'त्या' पत्रावर नेमकं काय म्हणाले?.
ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर महमूद यांचं निधन, 'या' आजाराशी देत होते झुंज
ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर महमूद यांचं निधन, 'या' आजाराशी देत होते झुंज.
नवाब मलिक यांना महायुतीत नो एन्ट्री, देवेंद्र फडणवीस यांचा लेटरबॉम्ब
नवाब मलिक यांना महायुतीत नो एन्ट्री, देवेंद्र फडणवीस यांचा लेटरबॉम्ब.
थंडीत सरकारला घामटा फुटणार? वडेट्टीवारांच्या घरी विरोधकांची खलबतं सुरू
थंडीत सरकारला घामटा फुटणार? वडेट्टीवारांच्या घरी विरोधकांची खलबतं सुरू.
राऊत माफी मागणार? त्या वक्तव्यावरून आरोग्यमंत्र्याचा थेट इशारा काय?
राऊत माफी मागणार? त्या वक्तव्यावरून आरोग्यमंत्र्याचा थेट इशारा काय?.
सुषमाताई, मातोश्रीतील सरडेही आत्महत्या करतील, झोंबणारं नेमक विधान काय?
सुषमाताई, मातोश्रीतील सरडेही आत्महत्या करतील, झोंबणारं नेमक विधान काय?.