AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खोतकरांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणारे अब्दुल सत्तार काय म्हणाले?

औरंगाबाद : भाजप-शिवसेनेच्या युतीनंतरही दानवे-खोतकर वाद सुटायला तयार नव्हता. मात्र, अखेर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नांना यश आले आणि हा वाद सुटला. अर्जुन खोतकरांनी माघार घेतली. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली. खोतकरांच्या या निर्णयानंतर त्यांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणारे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार ‘अर्जुनाने तलवार म्यान केली’, हे दुर्दैवी आहे, […]

खोतकरांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणारे अब्दुल सत्तार काय म्हणाले?
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM
Share

औरंगाबाद : भाजप-शिवसेनेच्या युतीनंतरही दानवे-खोतकर वाद सुटायला तयार नव्हता. मात्र, अखेर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नांना यश आले आणि हा वाद सुटला. अर्जुन खोतकरांनी माघार घेतली. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली. खोतकरांच्या या निर्णयानंतर त्यांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणारे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार ‘अर्जुनाने तलवार म्यान केली’, हे दुर्दैवी आहे, असे म्हणाले. तर खोतकरांनी माघार घेतल्याने नव्या उमेदवारासाठी काँग्रेसची पळापळ सुरु झाली आहे.

अर्जून खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातला वाढता वाद बघता काँग्रेसच्या अब्दुल सत्तार यांनी खोतकरांना काँग्रेसमध्ये आणण्याचे अनेक प्रयत्न केले. त्यांच्यात आणि खोतकरांमध्ये अनेकदा बैठकाही झाल्या. खोतकर हे काँग्रेसमध्ये येणार अशी खात्री सत्तार यांना होती, मात्र खोतकरांनी माघार घेतल्याने सत्तार हे पुरते निराश झाले आहेत.

अब्दुल सत्तार काय म्हणाले?

“अर्जुनाने तलवार म्यान केली आहे. पण राजकारणात आशा घटना सतत घडत असतात, मला 25 वर्षात पहिल्यांदा असं पाहायला मिळालं. या घटनेमुळे मला फार काही शिकायला मिळालं. कुणावर किती विश्वास ठेवायचा हे मला या घटनेतून कळालं. विश्वास घात असं म्हणणार नाही, पण घडलेली घटना दुर्दैवी आहे. याला विश्वास घात नाही म्हणता येणार, त्यांची मजबुरी म्हणता येईल”, असे वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलं.

“जालना लोकसभेत आमच्यावर जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती दुर्दैवी आहे. दोस्तीवर विश्वास करायचा की नाही करायचा हे मी माझ्या 36 वर्षाच्या राजकारणात शिकलो”, असेही सत्तार म्हणाले.

नव्या उमेदवारासाठी काँग्रेसची पळापळ?

अर्जुन खोतकर हे जालन्यातून काँग्रेसकडून लोकसभा लढवतील असे सत्तार यांना वाटत होते. मात्र, खोतकरांचं बंड थंडावल्यानंतर काँग्रेसमध्ये आता नव्या उमेदवारासाठी शोधाशोध सुरु झाली आहे. खोतकरांच्या माघारीनंतर काँग्रेसच्या कोअर कमिटीने तातडीची बैठक घेतली. या बैठकीला आमदार अब्दुल सत्तार, माजी आमदार कल्याण काळे हे उपस्थित होते. यावेळी आमची उमेदवारासाठी चाचपणी सुरु आहे, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली.

खोतकरांची माघार

शिवसेनेचे जालन्यातील नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचं बंड अखेर थंड पडलं आहे. औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत अर्जुन खोतकर यांच्याशी चर्चा झाली. या बैठकीनंतर अर्जुन खोतकर यांनी जालन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला.

औरंगाबादमधील शिवसेना-भाजपच्या मेळाव्यातील भाषणातून अर्जुन खोतकर यांनी माघार घेत असल्याची घोषणा केली. त्यामुळे जालन्यात रावसाहेब दानवे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे खोतकरांची समजूत काढण्यात यशस्वी ठरले आहेत.

नेमकं प्रकरण काय आहे?

जालना जिल्ह्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा छत्तीसचा आकडा आहे. त्यातच महिन्या-दोन महिन्यांपासून अर्जुन खोतकर लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा आपणच पराभव करणार असल्याचे सांगत होते. किंबहुना, आपणच दानवेंविरोधात लाढणार असल्याचेही खोतकरांनी म्हटले होते. शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले होते, त्यामुळे खोतकरांच्या बोलण्याला महत्त्व आले होते. मात्र, ऐनवेळी उद्धव ठाकरेंनी अमित शाहांच्या सोबत पत्रकार परिषद घेऊन शिवसेना-भाजप युतीची घोषणा केली आणि अर्जुन खोतकरांना घोषणांना धक्का बसला. मात्र, तरीही अर्जुन खोतकर मागे हटण्यास तयार नव्हते. जालन्यात मैत्रीपूर्ण लढत व्हावी, असे म्हणत अखेरपर्यंत अर्जुन खोतकर लढण्यावर ठाम राहिले. मात्र, अखेर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना त्यांचे बंड थंड करण्यात यश आलंय.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली