आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असेल तर कुणाला त्रास का व्हावा? नाना पटोलेंचा शिवसेनेला सवाल

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: सागर जोशी

Updated on: Jun 21, 2021 | 2:54 PM

स्वबळाचा नारा केवळ काँग्रेसनंच नाही तर शिवसेनेनंही दिला आहे. पण फक्त काँग्रेसला टार्गेट करण्याचं काम सुरु आहे. मी सामना वाचत नाही. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असेल तर कुणाला त्रास का व्हावा? कुणी आमच्यावर टीका करत असेल तर आम्ही त्याला महत्व देत नाही.

आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असेल तर कुणाला त्रास का व्हावा? नाना पटोलेंचा शिवसेनेला सवाल
नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

मुंबई : महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणूक एकत्र आणि जोमाने लढेल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलंय. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सातत्याने स्वबळाचा नाना सुरुच ठेवलाय. यावरुन शिवसेनेनं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये काँग्रेस आणि पर्यायानं नाना पटोले यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यात आलाय. कोरोना काळात स्वबळाचा नारा दिला तर लोक जोड्यानं मारतील असा टोला सामनातून लगावलाय. त्याला आता नाना पटोले यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Nana Patole’s reply to ShivSena MP Sanjay Raut’s criticism)

कोरोना काळात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन काम केलंय. रक्तदान, ऑक्सिजन पुरवठा, मास्क वाटप, प्लाझ्मा दान अशी अनेक कामं काँग्रेसनं केली आहेत. स्वबळाचा नारा केवळ काँग्रेसनंच नाही तर शिवसेनेनंही दिला आहे. पण फक्त काँग्रेसला टार्गेट करण्याचं काम सुरु आहे. मी सामना वाचत नाही. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असेल तर कुणाला त्रास का व्हावा? कुणी आमच्यावर टीका करत असेल तर आम्ही त्याला महत्व देत नाही. आम्ही जयंत पाटील यांनाही शुभेच्छा देतो की, त्यांनी शिवसेनेसोबत युती जाहीर करुन टाकावी, अशा शब्दात नाना पटोले यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलंय.

‘केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु’

प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राबाबतही पटोले यांना विचारण्यात आलं. त्यावेळी भाजपसोबत आघाडी करावी, असं सरनाईक यांनी म्हटलंय. त्यामागील मुख्य कारण केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा असल्याचं पटोले म्हणाले. भाजप केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून कधी शिवसेना तर कधी राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्रास देत असल्याचं आम्ही पाहतोय. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे, त्याचा काँग्रेस निषेध करतेय, असंही पटोले म्हणाले.

‘शरद पवारांचा हा पहिला प्रयत्न नाही’

दुसरीकडे शरद पवार राजधानी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरोधात 15 विरोधी पक्षांची मोट बांधत असल्याबाबत पटोलेंना पत्रकारांनी विचारलं. त्यावेळी पवार साहेबांचा हा काही पहिला प्रयत्न नाही. ज्या ज्या वेळी राजकीय समीकरण बदलतात, राजकारणात वेगळे वारे वाहू लागतात तेव्हा पवारांनी अशा भूमिका घेतलेल्या आहेत. त्यामुळे यात काही नवीन आहे असं म्हणणं चुकीचं असल्याचंही पटोले म्हणाले.

संबंधित बातम्या :

‘राष्ट्रमंच’च्या बॅनरखाली विरोधी पक्ष एकवटणार?, पवारांनी 15 पक्षांची बैठक बोलावली; भाजपविरोधात मोर्चेबांधणी सुरू

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकते, गिरीश बापटांना विश्वास

Nana Patole’s reply to ShivSena MP Sanjay Raut’s criticism

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI