सीरम इन्स्टिट्यूट पुणे महापालिकेला लस देण्यास तयार, मग केंद्राची परवानगी का नाही? काँग्रेसचा सवाल

केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय पुणे महापालिकेला लस मिळू शकणार नाही. अशावेळी केंद्र सरकारची परवानगी का मिळत नाही? असा सवाल काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी केलाय.

सीरम इन्स्टिट्यूट पुणे महापालिकेला लस देण्यास तयार, मग केंद्राची परवानगी का नाही? काँग्रेसचा सवाल
सीरम इन्स्टिट्यूट आणि काँग्रेस नेते मोहन जोशी
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 4:39 PM

पुणे : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. अशावेळी पुणे महापालिकेनं सीरम इन्स्टिट्यूटकडे लसीच्या पुरवठ्याची मागणी केलीय. सीरमकडूनही पुणे महापालिकेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलाय. मात्र, केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय पुणे महापालिकेला लस मिळू शकणार नाही. अशावेळी केंद्र सरकारची परवानगी का मिळत नाही? असा सवाल काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी केलाय. इतकंच नाही तर पुणे भाजपमध्ये दोन गट पडल्याचा आरोपही मोहन जोशी यांनी केलाय. (Mohan Joshi criticizes central government and BJP over Pune vaccination drive)

पुणे भाजपमध्ये दोन गट पडले आहेत. एक विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा. तर दुसरा खासदार गिरीश बापट यांचा असल्याचा दावा मोहन जोशींनी केलाय. त्यामुळेच गिरीश बापट दिल्ली दरबारी प्रयत्न करत नसल्याची टीकाही त्यांनी केलीय. तर दिल्लीत गिरीश बापटांची पत उरली नाही का? असा प्रश्न निर्माण झाल्याचा टोलाही जोशी यांनी लगावलाय. सीरम इन्स्टिट्यूटकडून लस मिळवण्याबाबत केंद्राची परवानगी मिळायला भाजपचा अंतर्गत कलह कारणीभूत ठरत असल्याची टीका त्यांनी केलीय. पुणेकरांच्या जीवाशी खेळू नका, केंद्रातून परवानगी मिळवा, अशी मागणी मोहन जोशी यांनी केलीय.

सीरम इन्स्टिट्यूट पुणे महापालिकेला लस देण्यास तयार

सीरम इन्स्टिट्यूटने पुणे महापालिकेला लस देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, लसीसाठी पुणे महापालिकेला केंद्र सरकारकडून आवश्यक परवानगी घ्यावी लागणार आहे. तसं पत्र सीरम इन्स्टिट्यूटकडून पुणे महापालिकेला देण्यात आलंय. सीरम इन्स्टिट्यूटकडून लस मिळावी यासाठी पुणे महापालिका गेल्या 3 आठवड्यापासून पाठपुरावा करत आहे. अशावेळी सीरमने परवानगी दिली आहे. पण केंद्र सरकार परवानगी देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र

सीरम इन्स्टिट्यूटकडून पत्र प्राप्त झाल्यानंतर पुणे महापालिकेनं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये सीरम इन्स्टिट्यूटकडून लसीच्या खरेदीची परवानगी मिळावी अशी मागणी महापालिकेकडून करण्यात आलीय. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका दोन दिवसांत जागतिक निविदा काढणार असल्याची माहितीही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलीय.

सिरम इन्स्टिट्युटची तयारी पण तांत्रिक अडचणीमुळे विलंब

सिरम इन्स्टिट्युटची पुण्याला लस देण्याची तयारी आहे. पण त्यासाठी काही तांत्रिक अडचणी आहेत. या अडचणी सोडविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली होती. तसेच यासंदर्भात मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आणि आयुक्त विक्रम कुमार यांनी सीरम इन्स्टिट्युटला भेट देऊन येथील अधिकार्‍यांशी चर्चा केल्याचे बोललं जात आहे. यावेळी पुण्याला लस देण्याचा आग्रही मागणी करण्यात आली.

संबंधित बातम्या :

पुण्यातील भारत बायोटेकच्या प्लांटची वेगाने उभारणी; शास्त्रज्ञ, अभियंत्यांच्या भरतीला लवकरच सुरुवात

राज्याच्या आरोग्य यंत्रणेत 442 नव्या रुग्णवाहिका दाखल; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

Mohan Joshi criticizes central government and BJP over Pune vaccination drive

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.