‘माझा मोबाईल, माझी जबाबदारी’, महापौरांच्या ट्विटला संदीप देशपांडेंचा टोमणा

ढकललं कार्यकर्त्यांवर. माझा मोबाईल, माझी जबाबदारी, असं ट्वीट करुन संदीप देशपांडे यांनी पेडणेकरांना टोला लगावलाय.

'माझा मोबाईल, माझी जबाबदारी', महापौरांच्या ट्विटला संदीप देशपांडेंचा टोमणा
मनसे नेते संदीप देशपांडे, महापौर किशोरी पेडणेकर


मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना सध्या ट्विटरवर जोरदार ट्रोल केलं जात आहे. पेडणेकर यांनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीच्या व्हिडीओवर एका युजर्सने लसीचे कंत्राट कुणाला दिलं? असा सवाल केलाय. त्यावर पेडणेकर यांच्या ट्विटर हँडलवरुन ‘तुझ्या बापाला’ असं उत्तर देण्यात आलंय. पेडणेकरांच्या या उत्तरावर सोशल मीडियावर जोरदार टीका केली जातेय. त्यावर पेडणेकर यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे. मात्र, त्यावर आता मनसेचे पदाधिकारी संदीप देशपांडे यांनी पेडणेकरांना टोमणा हाणलाय. ‘आलं अंगावर. ढकललं कार्यकर्त्यांवर. यापुढे माझा मोबाईल, माझी जबाबदारी, असं ट्वीट करुन देशपांडे यांनी पेडणेकरांना टोला लगावलाय. (Sandeep Deshpande criticizes Mayor Kishori Pednekar’s tweet)

“मुंबईकराना लस उपलब्ध व्हावी म्हणून ग्लोबल टेंडर काढला गेला आहे. मुंबईकरांच्या एक कोटी लसींसाठी नऊ कंपन्या समोर आहेत” अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना दिली होती. या व्हिडीओची लिंक ‘टीव्ही9 मराठी’च्या ट्विटर अकाऊण्टवर शेअर करण्यात आली होती. या ट्वीटवर एका युजरने “काँट्रॅक्ट कोणाला दिलं?” असा प्रश्न विचारला होता. त्यावर महापौरांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ‘तुझ्या बापाला’ असं उत्तर देण्यात आलं आहे. पेडणेकरांच्या या ट्वीटवरुन संदीप देशपांडे यांनी जोरदार टोला हाणलाय. ‘आलं अंगावर. ढकललं कार्यकर्त्यांवर. यापुढे माझा मोबाईल, माझी जबाबदारी, असं ट्वीट संदीप देशपांडे यांनी केलंय.

पेडणेकरांविषयी संताप

महापौरासारख्या पदावरील व्यक्तीने जाहीर व्यासपीठावरुन अशोभनीय वक्तव्य केल्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उठली आहे. अनेक जणांनी किशोरी पेडणेकर यांना आक्षेपार्ह ट्वीटबद्दल जाबही विचारला. त्यानंतर महापौरांनी अधिकृत ट्विटर हँडलवरुन केलेले ट्वीट डिलीट केले, मात्र या ट्वीटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

किशोरी पेडणेकर यांचं ‘ते’ ट्वीट

महापौर पेडणेकरांचं स्पष्टीकरण काय?

“ट्विटरवर जे काही लिहिलं ते मी लिहिलं नव्हतं. माझ्या कार्यकर्त्याच्या हातात मोबाईल होता. वांद्रे बीकेसीमध्ये कार्यक्रम सुरु होता, तेव्हा त्याच्या हातात मोबाईल दिला होता. त्या कार्यकर्त्याला मी समज दिली आहे. ते ट्वीट मी त्वरित डिलीट केलं आहे. शिवसैनिक कार्यकर्त्याने तो राग व्यक्त केला, पण ते चुकीचं होतं” असं स्पष्टीकरण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलं आहे. “आरोप करणाऱ्यांनी करत राहावे त्यांचं ते काम आहे, सर्व शहानिशा करुनच टेंडर दिल जाईल. दलाल वगैरे काही नाही, सर्व कागदपत्रे तपासून निर्णय घेतला जाईल” असं उत्तर महापौरांनी मनसेच्या आरोपांना दिलं.

संबंधित बातम्या :

लसीचे कंत्राट कोणाला दिले?, तुझ्या बापाला, महापौर पेडणेकरांच्या उत्तरावर सोशल मीडियावर संताप

‘तुझ्या बापाला’ ट्विट हा शिवसैनिकाचा राग होता, आक्षेपार्ह भाषेतील ट्वीटवर महापौर पेडणेकरांचं स्पष्टीकरण

Sandeep Deshpande criticizes Mayor Kishori Pednekar’s tweet

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI