AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra politics : शिवसेनेला आणखी एक धक्का; ठाणे, नवीमुंबई नंतर कोकणातील नगरसेवकही शिंदे गटात!

शिवसेनेला (shivsena) धक्क्यावर धक्के बसत आहेत. ठाणे (Thane), नवी मुंबई पाठोपाठ कोकणातील नगरसेवकांनी देखील शिंदे गटाचा रस्ता धरला आहे.

Maharashtra politics : शिवसेनेला आणखी एक धक्का; ठाणे, नवीमुंबई नंतर कोकणातील नगरसेवकही शिंदे गटात!
| Updated on: Jul 16, 2022 | 3:07 PM
Share

रत्नागिरी : शिवसेनेला (shivsena) धक्क्यावर धक्के बसत आहेत. ठाणे (Thane), नवी मुंबई पाठोपाठ कोकणातील नगरसेवकांनी देखील शिंदे गटाचा रस्ता धरला आहे. दापोली आणि मंडणगडमधील नगरसेवकांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दिल्याचे वृत्त समोर येत आहे. मुंबईमध्ये योगेश कदम यांच्या नेतृत्वात 11 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यामध्ये मंडणगडमधील आठ तर दापोलीमधील तीन शिवसेना नगरसेवकांचा समावेश आहे. विनोद जाधव, मुश्ताक दाभिळकर, योगेश जाधव, प्रमिला किंजळे, स्नेहल गुवळे, सापटे, प्रविण जाधव अशी मंडणगडमधील नगरसेवकांची नावे आहेत. तर  शिवानी खानविलकर आणि प्रति शिर्के या दापोलीमधील नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिलल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी ठाणे आणि नवी मुंबईमधील अनेक नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आडचणीत वाढ होताना दिसत आहे.

ठाण्यातील नगरसेवकांचा शिंदेंना पाठिंबा

दरम्यान सात जुलैरोजी ठाण्यातील 67  पैकी 66 माजी नगरसेवक हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे ठाण्यात शिवसेनेमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दिला. ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईतील काही नगरसेवकांनी शिंदेंना पाठिंबा दिला आहे. राज्याच्या अनेक प्रमुख महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामध्ये मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद अशा अनेक महत्त्वाच्या महापालिकांचा समावेश आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

विश्वनाथ भोईल यांची हकालपट्टी

आमदार विश्वनाथ भोईर यांची शिवसेनेच्या कल्याण शहरप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. विश्वनाथ भोईर हे शिवसेनेचे कल्याण पश्चिमचे आमदार आहेत. मात्र ते शिंदे गटात सहभागी झाल्याने त्यांना आता शिवसेनेच्या कल्याण शहरप्रमुख पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी सचिन बासरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिन बासरे यांचा देखील दांडगा जनसपर्क असून, ते शिवसेनेचे तीन टर्म नगरसेवक राहिले आहेत. शिवसेनेकडून शिंदे गटात गेलेल्या सर्वच आमदारांवर कारवाई करण्यात येत आहे. माजी आमदार विजय शिवतारे यांची देखील पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Follow Us
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?