‘शिवसेनेनं आधी UPAमध्ये यावं आणि मग बोलावं’, काँग्रेसच्या अजून एका नेत्याचा राऊतांना टोला

काँग्रेस नेते राऊतांच्या या वक्तव्याला विरोध करताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यानंतर आता युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही राऊतांना टोला हाणलाय.

'शिवसेनेनं आधी UPAमध्ये यावं आणि मग बोलावं', काँग्रेसच्या अजून एका नेत्याचा राऊतांना टोला
sanjay raut
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 4:22 PM

रत्नागिरी : “काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर नाही. त्यामुळे संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात UPAचं अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देण्यात यावं. काँग्रेसने शरद पवार यांचं नेतृत्व स्वीकारावं”, असा सल्ला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी दिला आहे. त्यावर आता काँग्रेस नेते राऊतांच्या या वक्तव्याला विरोध करताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यानंतर आता युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही राऊतांना टोला हाणलाय.(Satyajit Tambe criticizes Sanjay Raut over the statement on the post of UPA President)

शिवसेना UPAचा अजून तरी घटकपक्ष नाही. त्यामुळे शिवसेना UPAचा घटकपक्ष झाला तर त्यांच्या वक्तव्याचा विचार केला जाईल. UPAच्या बाहेरच्या व्यक्तीने मतप्रदर्शन करायचं आणि त्यावर आम्ही का बोलायचं, असं सत्यजित तांबे यांनी म्हटलंय. राज्यात आम्ही एकत्र आहोत. त्यामुळे शिवसेनेनं UPAमध्ये यावं. मग त्यांनी योग्य व्यासपीठावर मत मांडावं. तेव्हा त्यांच्या मतांचा आदर केला जाईल, असा खोचक टोला तांबे यांनी राऊतांना लगावला आहे. तांबे हे सध्या कोकणाच्या दौऱ्यावर आहेत.

‘संजय राऊत शरद पवारांचे प्रवक्ते आहे का?’

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘यूपीए’च्या अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचे नाव सुचवले होते. यावरुन काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांना फटकारले. संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला. ते गुरुवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. काँग्रेसचे नेते याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलले आहेत. मुळात शिवसेना यूपीएचा भागच नाही. मग त्यांना याबाबत चर्चा करण्याचा किंवा मत नोंदवण्याचा अधिकारच नाही, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

लक्ष देण्याची गरज नाही

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही राऊत यांच्या मागणीला केराची टोपली दावली आहे. यूपीए-2 नाही तर एकच राहणार आहे. सोनिया गांधीच यूपीएचं नेतृत्व करतील. राऊतांनी काँग्रेसवर बोलण्याची गरज नाही, असं थोरात म्हणाले. तसेच काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. काँग्रेसने अनेक चढउतार पाहिले आहेत. आज कठिण दिवस असले तरी काँग्रेसला चांगले दिवस येतील. यूपीएचं नेतृत्व सोनिया गांधीच करतील. त्यामुळे राऊत म्हणतात त्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले होते?

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (UPA) प्रमुखपदी शिवसेनेने शरद पवार यांचे नाव सुचवल्यामुळे काँग्रेस पक्ष नाराज झाल्याचा दावा संजय राऊत यांनी फेटाळून लावला. यूपीए आणखी मजबूत व्हायला पाहिजे, असे काँग्रेसमधील अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. सोनिया गांधी यांनी प्रदीर्घकाळ यूपीएचे अध्यक्षपद भुषविले आहे. मात्र, सध्या सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसते. देशात वेगळ्याप्रकराच्या घडामोडी घडत आहेत. अशावेळी यूपीएचे नेतृत्त्व काँग्रेसबाहेरील नेत्याने करावे, असे देशातील अनेक पक्षांची म्हणणे आहे.

अशावेळी शरद पवार यांच्याकडे किती खासदार आहेत, हा प्रश्न नाही. मी नेहमीच शरद पवार यांचे समर्थन केले आहे. जे पक्ष यूपीए किंवा एनडीएमध्ये नाहीत अशा पक्षांना एकत्र आणून यूपीएची पुनर्बांधणी झाली पाहिजे. अनेक पक्षांना शरद पवार यांचे नेतृत्त्व मान्य होऊ शकते, असे संजय राऊत यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

नाना पटोले म्हणाले, राऊतांनी कोणाचे प्रवक्ते जाहीर करावं, थोरात म्हणतात, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही

देवेंद्र फडणवीस हे सह्याद्री आणि मोदींपेक्षाही मोठे नेते, पण मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत: संजय राऊत

Satyajit Tambe criticizes Sanjay Raut over the statement on the post of UPA President

Non Stop LIVE Update
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.