AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रवाहाविरुद्ध राजकारण, प्रस्थापितांना घरी बसवलं; वाचा, दादा भुसेंची ‘राज’नीती

प्रवाहा विरुद्धचं राजकारण करणारा नेता, अशक्य ते शक्य करून दाखवणारा नेता... (dada bhuse low profile leader in maharashtra politics)

प्रवाहाविरुद्ध राजकारण, प्रस्थापितांना घरी बसवलं; वाचा, दादा भुसेंची 'राज'नीती
dada bhuse
| Updated on: Apr 02, 2021 | 7:10 PM
Share

मुंबई: प्रवाहा विरुद्धचं राजकारण करणारा नेता, अशक्य ते शक्य करून दाखवणारा नेता… अशी कृषी मंत्री दादा भुसे यांची राज्याच्या राजकारणात ओळख आहे. मालेगवातील प्रस्थापितांना भुसे यांनी कायमचं घरी बसवलं. त्यामुळे त्यांची ही ओळख अधिकच गडद झाली. नेमकं काय आहे हे प्रकरणं? दादा भुसे हे कोण आहेत? काय आहे त्यांचं राजकारण? यावर टाकलेला हा झोत… (dada bhuse low profile leader in maharashtra politics)

कोण आहेत दादा भुसे?

दादाजी दगडू भुसे यांचा जन्म 6 मार्च 1964 रोजी नाशिकच्या मालेगावमध्ये झाला. त्यांनी डीसीए पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. त्यांना दोन मुलं आहेत. मालेगाव बाह्य हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे.

साधा शिवसैनिक…

मालेगाव हा काँग्रेस आणि समाजवाद्यांचा गड म्हणून ओळखला जातो. काँग्रेस आणि समाजवाद्यांच्या वर्चस्ववादी राजकारणात कोणीही टिकून राहण्याची शक्यता नसताना आणि जिल्ह्यातील तरुणांचा कल या दोन्ही पक्षांकडे असतानाच भुसे यांनी मात्र शिवसेनेत काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन आपलं राजकारण सुरू केलं. त्यात त्यांना यशही आलं. सुरुवातीच्या काळात गावोगावी त्यांनी शिवसेनेच्या शाखा उभ्या केल्या. साधा शिवसैनिक ते तालुकाप्रमुख अशी मजलही त्यांनी मारली. भुसे हे सामान्य शेतकरी कुटुंबातून आले आहेत. घरात दुरून दुरूनही राजकीय वारसा नव्हता. तरीही त्यांनी आपल्या हिंमतीवर राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण केलं.

हिरे घराण्याला आव्हान

मालेगावात सहकारमहर्षी भाऊसाहेब हिरे यांचं वर्चस्व होतं. त्यांच्यानंतर त्यांच्या घरातील वारसांनी ही परंपरा कायम राखली. मालेगावमधील हिरे घराण्याच्या या वर्चस्वला भुसे यांनी हादरे दिले. गेली वीस वर्ष पक्षाचे काम करत असताना सुरुवातीला भुसे यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. नंतर मात्र, त्यांनी या पराभवावर मात केली. 2004 मध्ये प्रस्थापित हिरे घराण्याचा त्यांनी पराभव केला. त्यानंतर भुसे यांनी मागे वळून पाहिले नाही. मालेगाव बाह्य मतदारसंघात त्यांनी सलग चारवेळा दणदणती विजय मिळवला. विशेष म्हणजे गेल्यावेळी देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये ते ग्रामविकास राज्यमंत्री होते, तर ठाकरे सरकारमध्ये त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. शेतकरी कुटुंबातून आलेल्या भुसेंना कृषीमंत्रीपद मिळाल्याने शेतकऱ्यांना न्याय देण्याची त्यांना संधी मिळाली आहे.

राजकारणी, समाजकारणी कुटुंब

भुसे हे राजकारणात आहेतच. पण त्यांची पत्नी अनिता या सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत. तर त्यांचे चिरंजीव अजिंक्य आणि अविष्कार हे युवासेनेत सक्रिय आहेत. अविष्कार तर युवा सेनेचे राज्य संघटक आहेत. त्यामुळे राजकारण आणि समाजकारणाला वाहून घेतलेलं कुटुंब म्हणूनही भुसे यांच्या कुटुंबाकडे पाहिलं जातं. (dada bhuse low profile leader in maharashtra politics)

वेषांतर करून साठेबाजी उघड

पूर्वी राजे लोक राज्याचा हालहवाल जाणून घेण्यासाठी राज्यात वेषांतर करून फिरायचे आणि गुन्हेगारांना शिक्षा द्यायचे. मंत्री झाल्यानंतर भुसे यांनीही हाच कित्ता गिरवला होता. खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना खत दिलं जात नसल्याचा खत विक्रेत्यांनी युरियाची साठेबाजी केल्याच्या तक्रारी भुसे यांच्याकडे आल्या होत्या. तसेच एका खतावर दुसरे खत किंवा बियाणे घेण्याची सक्ती करण्यात येते. युरियाची जादा दराने विक्री करण्यात येत असल्याच्या तक्रारीही त्यांच्याकडे आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी थेट औरंगाबादमध्ये छापा मारला. चेहऱ्यावर मोठा बागायतदार रुमाल बांधला. एका कार्यकर्त्याच्या दुचाकीवरून ते जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील नवभारत फर्टिलायझर्स या दुकानात पोचले आणि त्यांनी दुकानदाराकडे युरिया खताची मागणी केली. पण विक्रेत्याने खत नसल्याचे सांगितले. ‘दहा नसतील तर, किमान पाच बॅग तरी युरिया द्या,’ अशी विनंती त्यांनी केली. तब्बल अर्धा तास ते खताची मागणी करत होते. मात्र, खत विक्रेता खत देण्यास नकार देत होता. त्यावेळी त्यांनी,’फलकावर खताचा साठा असल्याचे का लिहिलेले आहे, साठा रजिस्ट्रर कुठे आहे,’ अशी विचारणा केली. त्यावर विक्रेत्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. दुकानात अनागोंदी आहे, हे लक्षात आल्यावर कृषिमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवून घेतले आणि दुकानातून युरिया खताचा साठा जप्त करून दुकानदारावर कारवाई केली. (dada bhuse low profile leader in maharashtra politics)

संबंधित बातम्या:

नवी मुंबईचे ‘गॉड’, शिवसेना, राष्ट्रवादी ते भाजप…; कसा आहे गणेश नाईकांचा राजकीय प्रवास?, वाचा!

‘भोळ्या शंकरा’, ‘पाणीदार आमदार’; जाणून घ्या, कोण आहेत शंकरराव गडाख?

पवारांचे खंदे समर्थक, कागलकरांच्या मनातला ‘हिंदकेसरी’; जाणून घ्या, कोण आहेत हसन मुश्रीफ?

(dada bhuse low profile leader in maharashtra politics)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.