शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर दत्तात्रय भरणे एक पाऊल मागे, मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त

सोलापुरातील एका जाहीर कार्यक्रमात बागेच्या कामाबाबत बोलताना 'मुख्यमंत्री जाऊ द्या, मरु द्या' असं वक्तव्य दत्तात्रय भरणे यांनी केलं होतं. त्याबाबत दत्तात्रय भरणे यांनी दिलगिरी व्यक्त करावी अन्यथा पालकमंत्र्यांची जिभ काढून हातात देऊ, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख गुरुशांत धुतरगावकर यांनी दिला होता. त्यानंतर या वादावर पडदा टाकत दत्तात्रय भरणे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर दत्तात्रय भरणे एक पाऊल मागे, मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या एका वक्तव्यानंतर शिवसेना पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. सोलापुरातील एका जाहीर कार्यक्रमात बागेच्या कामाबाबत बोलताना ‘मुख्यमंत्री जाऊ द्या, मरु द्या’ असं वक्तव्य दत्तात्रय भरणे यांनी केलं होतं. त्याबाबत दत्तात्रय भरणे यांनी दिलगिरी व्यक्त करावी अन्यथा पालकमंत्र्यांची जिभ काढून हातात देऊ, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख गुरुशांत धुतरगावकर यांनी दिला होता. त्यानंतर या वादावर पडदा टाकत दत्तात्रय भरणे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. (Dattatraya Bharane apologized after ShivSena aggressive)

मुख्यमंत्री आमचे नेते आहेत. त्यांच्यावर माझे प्रेम आहे. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय. आता भरणे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर स्थानिक पातळीवर सुरु झालेल्या या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.

नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, गटनेत्यांनी, नगसेवकांनी, आयुक्तांनी मला परवानगी दिली आहे. इथं चांगलं गार्डन आपल्याला करायचं आहे. त्यासाठी आपल्याला एक कोटी रुपये निधी द्यायचा आहे. तुमचा प्रस्ताव कधी येईल मला? असं बोलत असताना एका महिला पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं असता ते मुख्यमंत्र्यांचं जाऊ द्या, मरु द्या, आपलं आपण करु. मुख्यमंत्र्यांकडून आपण मोठा निधी घेऊ. आपण आपल्या पातळीवरुन सुरुवात करु. कलेक्टर आहेत, तुम्ही आहेत, आयुक्त आहेत. आपण सुरुवात करुया, असं वक्तव्य दत्तात्रय भरणे यांनी केलं होतं. त्यानंतर या वादाला तोंड फुटलं होतं.

माजी मंत्री तानाजी सावंतांचा भरणे यांना इशारा

दरम्यान, सोलापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी दत्तात्रय भरणे यांना सज्जड दम दिलाय. भरणे मामा तुम्ही औकातीत राहा. आम्ही बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. उद्धव ठाकरे यांच्या जिवावर तुम्ही सत्तेत आहात. तुम्हाला जनतेनं फेकुन दिलं होतं. भरणे यांची हिम्मत असेल तर त्यांनी उजनीची सीमा ओलांडून दाखवावी. शिवबंधनाची ताकद पहायची आहे का. महाविकास आघाडी आहे आणि आमच्यावर बंधन आहे म्हणून आम्ही शांत आहोत. आमच्यावर काही बोलून छातीवर ठोकायची वेळ येऊ देऊ नका. भरणे यांना योग्य वेळी शिवसैनिकांच्या माध्यमातून उत्तर देऊ, असा इशाराच तानाजी सावंत यांनी दिला आहे.

इतर बातम्या :

असे राज्यपाल येऊ शकतील असं बाबासाहेबांनाही वाटलं नसेल; मुश्रीफ यांचा राज्यपाल कोश्यारींना खोचक टोला

मोदी म्हणतात, भारत-पाक फाळणीचा स्मृती दिन साजरा करणार; पटोले म्हणातात, हा तर देशांतर्गत फाळणीचा डाव

Dattatraya Bharane apologized after ShivSena aggressive

Published On - 3:01 pm, Sun, 15 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI