प्रवीण दरेकर म्हणाले, राष्ट्रवादीचे घोटाळे बाहेर काढणार, अजितदादांचं जशास तसं प्रत्युत्तर

मुंबै बँकेची चौकशी लावल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी संतापून 'आता माझा एककलमी कार्यक्रम हा घोटाळे बाहेर काढण्याचा असणार आहे', असं म्हटलं. दरेकरांच्या या इशाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिलं.

प्रवीण दरेकर म्हणाले, राष्ट्रवादीचे घोटाळे बाहेर काढणार, अजितदादांचं जशास तसं प्रत्युत्तर
ajit pawar

मुंबई :  मुंबै बँकेची चौकशी लावल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी संतापून ‘आता माझा एककलमी कार्यक्रम हा घोटाळे बाहेर काढण्याचा असणार आहे’, असं म्हटलं. दरेकरांच्या या इशाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिलं. ‘जर पुरावे असतील तर खुशाल तक्रार करावी. सरकारच्या आदेशाने चौकशी यंत्रणा चौकशी करतील. त्यातून पुढे जे निष्पन्न व्हायचं ते होईल’, असं म्हणत अजित पवारांनी प्रवीण दरेकर यांचं आव्हान परतावून लावलं आहे.

अजित पवार यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एमपीएससी, सैन्य भरती, ओबीसी आरक्षण, मुंबै बँक चौकशी यासह आदी विषयांवर अजित पवारांनी आपली रोखठोक मतं मांडली. तसंच विरोधकांच्या आरोपांना जशास तशी उत्तरही दिली.

प्रवीण दरेकरांना रोखठोक उत्तर

पुणे जिल्हा बँकेत महाभ्रष्टाचार आहे. त्याची तक्रार ईडी, सीबीआय आणि केेंद्र सरकारकडे करणार असल्याचं विधान दरेकरांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना केलं. तसंच राज्यातील राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या बँकांच्या देशील तक्रारी केंद्र सरकारकडे करणार असल्याचं दरेकर म्हणाले. दरेकरांच्या प्रश्नांवर अजितदादांनी रोखठोक उत्तर दिली.

पुरावे असतील तर तक्रार करा

अजित पवार म्हणाले,  “प्रत्येक संस्थेबद्दल कुणाचं काही मत असेल तर केंद्र सरकार, राज्य सरकार त्यांच्या वेगवेगळ्या विभागामार्फत चौकशी करु शकते. कुणाला काही वाटत असेल, काही माहिती असेल तर तर त्यांनी संबंधितांकडे तक्रार करावी. तक्रारीची चौकशी केली जाईल. तक्रारीत तथ्य असेल तर संबंधितांवर अॅक्शन घेण्यात येईल, जर तथ्य नसेल तर तक्रारीत तथ्य नाही, असं सांगण्यात येईल.”

किरीट सोमय्या कारखान्यांचा विषय काढतात, वेगवेगळे आरोप करतायत. तर प्रवीण दरेकर राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या बँकेच्या भ्रष्टाचारावर बोलतात. भाजपला काय इशारे द्यायचेत?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर अजित पवारांनी खास शैलीत उत्तर दिलं. ते म्हणाले, “हे नेमकं काय चाललंय, राजकारण आहे की नाही हे मीडियाने ठरवायचं. काहींची सत्ता येत असते, काहींची जात असते. पण सध्या राजकारणाला उगीच उत आलाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण ज्याचा त्याचा राजकारणाचा तो भाग असतो”.

डिसेंबर महिन्यात सैन्यभरती

अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सैन्य भरती आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जागा भरण्यासंदर्भात माहिती दिली. कोल्हापूरला डिसेंबर महिन्यात सैन्य भरती होईल, असं अजित पवार म्हणाले आहेत. तर, राज्याच्या वेगवेगळ्या विभागातील रिक्तपदांची माहिती 30 सप्टेंबरपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडं द्यावी, अशा सूचना विभागांना देण्यात आल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.

कोल्हापूरला डिसेंबरमध्ये सैन्य भरती

कोल्हापूरला डिसेंबरमध्ये सैनिक भरती आहे. त्यासंदर्भात प्रशासनाला आदेश दिले आहेत, नियमावलीची अडचण न येता, भरती कशी होईल याचं नियोजन पोलिसांनी करावं, अशा सूचना दिल्या आहेत. राज्यात सैनिकांची भरती असेल तिथे मुलींना संधी मिळावी, असं अजित पवार म्हणाले आहेत.

(DCM Ajit Pawar Slam Pravin Darekar over Scam Allegation)

हे ही वाचा :

कोल्हापूरला डिसेंबरमध्ये सैन्य भरती, MPSC तर्फे लवकरच जाहिराती निघणार, अजित पवारांची माहिती

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI