तुम्ही कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामे करा, अजितदादांच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्या

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीप्रमाणे शनिवारचे बारामीत दौऱ्यावर आहेत. आजही त्यांनी अगदी सकाळी 6 वाजता कामाला सुरुवात केली. अगदी सकाळी झालेल्या कार्यक्रमावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.

तुम्ही कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामे करा, अजितदादांच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्या
अजित पवार, उपमुख्यमंत्री

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीप्रमाणे शनिवारचे बारामीत दौऱ्यावर आहेत. आजही त्यांनी अगदी सकाळी 6 वाजता कामाला सुरुवात केली. अगदी सकाळी झालेल्या कार्यक्रमावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. तुम्ही मला कसलीही कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामे करा, असं अजितदादा अधिकाऱ्यांना म्हणाले.

कारणं सांगू नका, माझ्या गतीने कामं करा

प्रत्येक शनिवारी अजित पवार बारामती दौऱ्यावर असतात. आजही अजितदादांनी बारामतीमधल्या नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी अधिकाऱ्यांना कुठल्याशा कामात उशीर होत असल्याबद्दल कारण सांगितलं. यावेळी अजितदादांनी मला कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामे करा. दिवाळीपूर्वी कामे पूर्ण करा, लागेल तिथे सहकार्य करु, अशा सूचना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

निधी कमी पडल्यास पुरवणी मागण्यात तरतूद करु

आपण इथे आल्यानंतर सकाळी सहा वाजल्यापासून अधिकाऱ्यांना कामे आहेत. अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनीही काम केलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले. वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून आपण बारामतीकरांना सोई सुविधा उपलब्ध करत आहोत. बारामतीकर सहकार्य करत आहेत म्हणून मी लोकप्रतिनिधी म्हणून विकास करु शकतो. सध्या शहरांत विविध विकासकामे सुरु आहेत. निधी कमी पडल्यास पुरवणी मागण्यात तरतूद करु, असंही अजितदादांनी बारामतीकरांना सांगितलं.

दिवाळीपूर्वी कामे पूर्ण करा, अधिकाऱ्यांना सूचना

दिवाळीपूर्वी कामे पूर्ण करा. लागेल तिथे सहकार्य करु. रस्त्याच्या बाजूच्या घरांना पर्यायी जागा द्या. कुणी पेताड खाताड आला तर उद्योग होईल. आपल्या प्रत्येक नागरीकाचा जीव महत्वाचा आहे, असंही अजितदादा म्हणाले.

नाहीतर मग आपल्या पदाचा काय उपयोग?

विविध संस्थांच्या निवडणुका होत आहेत. त्यावरही अजितदादांनी भाष्य केलं. आमच्यावर विश्वास असलेल्या लोकांनी साथ द्यावी. समविचारी लोकांना एकत्र घेवून निवडणुक लढवू, असं ते म्हणाले. सोमेश्वर कारखाना निवडणुकीत कपबशी चिन्ह मिळालं ना, अशी अजितदादांनी विचारणा केली. त्यावर अद्याप चिन्ह वाटप नसल्याची पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली. त्यावर आपण आधी मागणी केलीय तर तेच चिन्ह मिळेल ना.. नाहीतर मग आपल्या पदाचा काय उपयोग, असं अजितदादा म्हणाले. त्यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला.

पवारसाहेबांच्या स्वप्नातील बारामती निर्माण करतोय

अधिकाधिक विकासकामे मार्गी लावून पवारसाहेबांच्या स्वप्नातील बारामती निर्माण करतोय. विकास प्रक्रिया हे एकट्या दुकट्याचं काम नाही. सर्वांनीच यामध्ये सहभागी व्हायला हवं, असंही अजितदादा म्हणाले.

मी आलो तरी मला उधार देऊ नका

पेट्रोल डिझेल, गॅस उधारीवर देऊच नका, माझी गाडी आली तरी पैसे घ्यायचेच, अजिबात उधारीचा धंदा नको, उधार कोणालाच नाही.. मी आलो तरी नाही द्यायचं म्हटल्यावर बाकीच्यांचं काय घेवून बसला, असंही अजित दादा म्हणाले. तसंच ग्राहकांशी नीट वागा.. उद्धट वागू नका, अशा सूचनाही अजितदादांनी कर्मचाऱ्यांना दिल्या.

इलेक्ट्रिक वाहनांवर भर द्यायला हवा

मागच्या पंधरा दिवसात मी इलेक्ट्रिक रिक्षा चालवली. अतिशय सुंदर.. आवाज येत नाही.. कमी खर्चात चालते. सीएनजीवर ट्रॅक्टर चालत आहे. इथेनॉलवर ट्रॅक्टर चालवण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

मेरीटच्या मुलामुलींना संधी मिळेल

अजित पवारांनी पुणे जिल्हा बॅंक भरतीवरही यावेळी भाष्य केलं. लेखी परिक्षेत पास झाल्याशिवाय कोणाचीही भरती केली जाणार नाही. मेरीटच्या मुलामुलींना संधी मिळेल, असं त्यांनी सांगितलं.

सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक होते आहे. यासंबंधी सभासद मेळावा आज दुपारी ४ वाजता होणार आहे. सोमेश्वर येथे हा मेळावा होणार आहे. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्याना उपस्थित राहण्याच्या अजितदादांनी सूचना दिल्या.

(Maharashtra DCM Ajit Pawar taunt officer in baramati)

हे ही वाचा :

भाजपला 4 राज्यांत धडा मिळाला, गुजरातसह 3 राज्यांचे मुख्यमंत्री बदलले, मोदी-नड्डांनी दुरुस्तीचं काम हाती घेतलं : संजय राऊत

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI