राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, प्रत्येत शेतकऱ्याला 50 हजाराची मदत द्या; राज ठाकरेंची आक्रमक मागणी

गुलाब चक्रीवादळाचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसलाय. अनेक भागात शेती पिकांसह जमीन खरवडून गेलीय. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, आदी पिकांचं 100 ठक्के नुकसान झालंय. तर फळबागाही उद्ध्वस्त झाल्या आहेत. अशावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारकडे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, प्रत्येत शेतकऱ्याला 50 हजाराची मदत द्या; राज ठाकरेंची आक्रमक मागणी
राज ठाकरे, मनसे अध्यक्ष


मुंबई : यंदाच्या पावसानं राज्यातील शेतकऱ्याला अक्षरश: उद्ध्वस्त केलं आहे. मागील काही दिवसांपासून संपूर्ण मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. गुलाब चक्रीवादळाचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसलाय. अनेक भागात शेती पिकांसह जमीन खरवडून गेलीय. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, आदी पिकांचं 100 ठक्के नुकसान झालंय. तर फळबागाही उद्ध्वस्त झाल्या आहेत. अशावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारकडे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. (Declare a wet drought in Maharashtra, MNS president Raj Thackeray’s demand)

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला 50 हजार रुपयांची तातडीची मदत द्या, अशी मागणी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे. पंचनामे होत राहतील. आधी शेतकरी आणि पूरग्रस्त नागरिकांना मदत द्या, अशी आक्रमक मागणी राज ठाकरे यांनी केलीय.

पोकळ शब्द किंवा आश्वासने नको – फडणवीस

मराठवाड्यात पूरस्थिती ओढवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून शेतकरी आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याचं आवाहन सरकारला केलं आहे. केवळ पोकळ आश्वासने देऊ नका. प्रत्यक्ष मदत करा, असं आवाहनच देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

या घटकांचा विचार करा

राज्यात विशेषत: मराठवाड्यात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. लाखो हेक्टरवर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकर्‍यांना तत्काळ मदत दिली पाहिजे. निसर्ग, तौक्ते ही दोन चक्रीवादळं आणि पुराची कोकणात अजून मदत मिळाली नाही. अशात मराठवाड्यासंदर्भात जी माहिती राज्य सरकारनेच दिली, ती अतिशय धक्कादायक आहे. यंदाच्या पावसाळ्यात 436 लोकांना आपले प्राण गमवावे लागले, यातूनच या स्थितीची भीषणता लक्षात येते. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहे. कोरोनामुळे सातत्याने लहान घटक संकटात असताना आणि त्यांना कोणतीही मदत स्वतंत्रपणे दिली जात नसताना या आकस्मिक संकटांनी शेतकरी, कष्टकरी, हातावर पोट असणारे घटक खचून जाणार नाहीत, याची काळजी राज्य सरकारने घेतली पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री मराठवाडा दौरा करणार

राज्याने आत्तापर्यंत अनेक मदतीसाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठविले, तौक्ते चक्रीवादळाची मदतदेखील अजून मिळालेली नाही. मागे 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केले होते, त्यापैकी 7 हजार कोटींचं पॅकेजचं वाटप आत्तापर्यंत करण्यात आले. राज्यात एकूण किती जिल्हे प्रभावित झाले त्याची माहिती घेऊन पुढील कॅबिनेटमध्ये चर्चा केली जाणार. त्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी चर्चा केली जाईल, असं आश्वासन विजय वडेट्टीवार यांनी दिली.

1667 कच्ची घरे पडल्याची माहिती. 19 घरं पडल्याची माहिती. काल अनेक मंत्री मंत्रिमंडल बैठकीला उपस्थित नव्हते. ते आपआपल्या जिल्ह्यात होते, आपण पाहिले असेल अनेक मंत्री बांधावर जाऊन पाहाणी केली होती. लातूर , बीड, धुळे, नंदुरबार, उस्मानाबादचे पालकमंत्री तेथे उपस्थित होते. मुख्यमंत्री सुद्धा मराठवाडा दौ-यावर जाणार, असे मला मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

काँग्रेसची मागणी धूडकावली? तीन सदस्यीय प्रभाग प्रस्ताव राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठवला, शिक्कामोर्तब होणार?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही आघाडी होणार का? जयंत पाटलांनी सांगितला फॉर्म्यूला

Declare a wet drought in Maharashtra, MNS president Raj Thackeray’s demand

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI