AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीच्या वाऱ्या वाढल्या म्हणजे मंत्रिमंडळाच्या याद्या जवळपास निश्चित, केसरकरांचा दावा; कालच्या दाव्यानंतर आता सावध भूमिका!

केसरकर यांनी कालच रविवारपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होईल असा दावा केला होता. मात्र, आता विस्ताराबाबत ते सावध वक्तव्ये करत असल्याचं पाहायला मिळतंय. तर संजय राऊतांवर सूडबुद्धीनं कारवाई होत नाही हे कोर्टानं कोठडी वाढवल्यानं स्पष्ट झालंय, असही केसरकर म्हणाले.

दिल्लीच्या वाऱ्या वाढल्या म्हणजे मंत्रिमंडळाच्या याद्या जवळपास निश्चित, केसरकरांचा दावा; कालच्या दाव्यानंतर आता सावध भूमिका!
आ. दीपक केसरकर, शिंदे गटाचे प्रवक्तेImage Credit source: Google
ReporterSameer Bhise
ReporterSameer Bhise | Edited By: sagar joshi | Updated on: Aug 04, 2022 | 4:02 PM
Share

मुंबई : राज्यात शिंदे सरकार स्थापन होऊन महिना उलटून गेला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होऊ शकलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीवाऱ्या मात्र सुरुच आहेच. अशावेळी शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सूचक वक्तव्य केलंय. दिल्लीच्या वाऱ्या वाढल्या म्हणजे मंत्रिमंडळाच्या याद्या जवळपास निश्चित होत असतात. महत्वाची बाब म्हणजे केसरकर यांनी कालच रविवारपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होईल असा दावा केला होता. मात्र, आता विस्ताराबाबत ते सावध वक्तव्ये करत असल्याचं पाहायला मिळतंय. तर संजय राऊतांवर सूडबुद्धीनं कारवाई होत नाही हे कोर्टानं कोठडी वाढवल्यानं स्पष्ट झालंय, असही केसरकर म्हणाले.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारलं असता केसरकर म्हणाले की, मला ज्या प्रमाणे वरिष्ठ सांगतात तसं मी सांगत असतो. चार दिवसात होईल अस सांगितलं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. काही कारणामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा वेळ वाढला. मुख्यमंत्री राज्यपालांना कळवतील तेव्हाच विस्तार होईल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्लीच्या वाऱ्या वाढल्या म्हणजे मंत्रिमंडळाच्या याद्या जवळपास निश्चित होत असतात. मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यपालांना कळवतील, असंही केसरकर यांनी सांगितलं.

सततच्या दौऱ्यामुळे तब्येतीवर ताण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखवण्यात आलं. सत्तास्थापनेपासून एकनाथ शिंदे यांचे सातत्याने दौरे सुरु आहेत. त्यामुळे त्यांना थकवा जाणवू लागलाय. अशावेळी डॉक्टरांनी शिंदे यांना आराम करण्याचा सल्ला दिलाय. त्याबाबत विचारलं असता केसरकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या सततच्या दौऱ्यामुळे तब्येतीवर ताण आला. शिंदेंना डॉक्टरांनी एक दिवस आरामाचा सल्ला दिला असल्याचं केसरकरांनी सांगितलं.

एकनाथ शिंदेंना थकवा, आरामाचा सल्ला

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याासून ते सत्ता स्थापन करेपर्यंत त्यांची धावपळ सुरू आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचे राज्यात ठिकठिकाणी सत्कार झाले. त्यानिमित्ताने त्यांना फिरावं लागलं. तसेच मंत्रालयात बैठकांवर बैठका घेऊन अनेक प्रश्न मार्गी लावावे लागले. त्यानंतर त्यांना वारंवार दिल्लीतही जावं लागलं. विशेष म्हणजे रात्री अपरात्रीही त्यांनी दिल्लीत जावं लागलं. त्यामुळे झोप पुरेशी मिळू शकली नाही. ते होत नाही तोच त्यांनी राज्यात दौरे सुरू केले. या निमित्ताने त्या त्या जिल्ह्यातील पूर स्थितीचा आढावा घेतानाच राजकीय सभांनाही ते संबोधित करत होते. परिणामी त्यांची दगदग झाली. त्यामुळे त्यांना थकवा आला असावा असं सांगण्यात येतं.

Follow Us
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...