Eknath Shinde : सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी शिंदे गटातून आली मोठी बातमी! दीपक केसरकरांनी सांगितले 3 मोठे मुद्दे

Eknath Shinde : सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी शिंदे गटातून आली मोठी बातमी

Eknath Shinde : सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी शिंदे गटातून आली मोठी बातमी! दीपक केसरकरांनी सांगितले 3 मोठे मुद्दे
एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर
आयेशा सय्यद

|

Jun 27, 2022 | 9:14 AM

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय राडा आता सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहोचलाय. त्यामुळे एकनाथ शिंदे गटासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. 16 आमदारांच्या निलंबन नोटिसीविरोधात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आलीय. त्याबाबत आज सुनावणी पार पडणार आहे.  सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी शिंदे गटातून आली मोठी बातमी आली आहे. दीपक केसरकरांनी 3 मोठे मुद्दे सांगितले आहेत. “सुप्रीम कोर्टात जिंकणार तर आम्हीच, पण हरलो गट स्थापन करावा लागेल, आज पत्रक काढून भूमिका जाहीर करु”, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.

1. जिंकणार आम्ही, पण हरलोच तर गट स्थापन करावा लागेल

एकनाथ शिंदे गटासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. 16 आमदारांच्या निलंबन नोटिसीविरोधात एकनाथ शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. त्याबाबत आज सुनावणी पार होणार आहे. पण त्याआधी दीपक केसरकर यांनी मोठं विधान केलं आहे. “सुप्रीम कोर्टात जिंकणार तर आम्हीच, पण हरलो गट स्थापन करावा लागेल”, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.

2. पालिका निवडणुकांसाठीचा संघर्ष नको म्हणून बंडखोरी

सध्या महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी टीव्ही 9 मराठीसोबत बातचित केली. तेव्हा येत्या पालिका निवडणुकांसाठीचा संघर्ष नको म्हणून बंडखोरी केल्याचं त्यांनी सांगितलं.

3. आज पत्रक काढून भूमिका जाहीर करणार

“आमच्याकडे बहुमत आहे. आम्हीच खरी शिवसेना आहोत. त्यामुळे सुप्रीम कोर्टात जिंकणार तर आम्हीच, पण हरलो गट स्थापन करावा लागेल. आज पत्रक काढून आम्ही आमची भूमिका जाहीर करु”, असं केसरकर म्हणालेत.

हे सुद्धा वाचा

वरिष्ठ वकील बाजू मांडणार

शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्यानंतर शिंदे गटाची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे मांडणार आहेत. तर सरकारकडून सुप्रसिद्ध वकील कपिल सिब्बल बाजू मांडणार आहेत. त्यामुळे आता 16 आमदारांवर कारवाई होणार की, बंडखोर नेत्यांच्या बाजूने न्यायालय निर्णय देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें