AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंदोलन भडकवण्यासाठी युट्यूब चॅनलला मुंबईतून फंडिंग, वरळीत सर्च ऑपरेशन; थेट दिल्लीची टीम…

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात लाखो विद्यार्थी सहभागी झाले. पण आता आंदोलनाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आंदोलन भडकवण्यासाठी युट्यूब चॅनलला मुंबईतून फंडिंग, वरळीत सर्च ऑपरेशन; थेट दिल्लीची टीम...
Delhi Jantar MantarImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 25, 2026 | 4:05 PM
Share

दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमने मुंबईत कारवाई केली आहे. या आंदोलनाच्या आडून काही युट्यूब चॅनेल किंवा आंदोलन भडकवण्यासाठी मुंबईतून निधीपुरवठा (फंडिंग) होत असल्याचे तपासात निदर्शनास आले होते. त्याअनुषंगाने दिल्ली पोलिसांची स्पेशल टीम काल मुंबईत आली होती. या टीमध्ये धडक कारवाई केली आहे.

नेमकं काय घडलं?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीने वरळी येथील एका ठिकाणी सर्च ऑपरेशन केले. या कारवाई दरम्यान काही जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना पुढील तपासासाठी दिल्लीला नेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

संबंधित व्यक्तींना ताब्यात घेतले

दिल्ली पोलिसांच्या तपासात असे समोर आले होते की, जंतर मंतर येथील आंदोलनाच्या नावाखाली काही युट्यूब चॅनेलद्वारे किंवा आंदोलन भडकवण्याच्या हेतूने मुंबईतून आर्थिक मदत पुरवली जात होती. या संशयाच्या आधारे दिल्ली पोलिसांनी मुंबईत कारवाई केली. वरळीतील सर्च ऑपरेशनमध्ये संबंधित व्यक्तींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी तपास सुरू असून, दिल्ली पोलिस आणि मुंबई गुन्हे शाखा एकत्रितपणे पुढील कारवाई करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आंदोलनाच्या नावाखाली होणाऱ्या निधीपुरवठ्याच्या आणि संबंधित युट्यूब चॅनेल्सच्या भूमिकेबाबत अधिक माहिती तपासात समोर येण्याची शक्यता आहे.

कॉकरोच जनता पार्टीचा विजय

दिल्लीत जंतर मंतर येथे नीट पेपर फुटी प्रकरणी विद्यार्थांचे आंदोलन सुरु होते. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी लाखो विद्यार्थांनासह केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आता त्यांनी राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमित शाह यांचा फोन आला आणि त्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले. त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे देखील दिल्लीला रवाना होणार असल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिंदे हे सध्या ठाण्यात आहेत. पण संध्याकाळी ते अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना होणार आहे. आता या भेटीत नेमकं काय घडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
आत्ता जर सरकारने ऐकलं नाही तर... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर...
आत्ता जर सरकारने ऐकलं नाही तर... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर दमानियांची सुचक प्रतिक्रिया
This is the Beginning of the End... मोदी सरकारचा शेवट जवळ आलाय
This is the Beginning of the End... मोदी सरकारचा शेवट जवळ आलाय; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया
इकडे धर्मेद्र प्रधानांचा राजीनामा तिकडे मुख्यमंत्री फडणवीस थेट दिल्लील
इकडे धर्मेद्र प्रधानांचा राजीनामा तिकडे मुख्यमंत्री फडणवीस थेट दिल्लीला रवाना; मोठ्या...
उशिरा का होईना, न्याय मिळालाच, ही युवा पिढी जिंकली! - सुप्रिया सुळे
Supriya Sule | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; उशिरा का होईना, न्याय मिळालाच, ही युवा पिढी जिंकली!
भर मंचावरूनच... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दीपकेंची पहिली...
भर मंचावरूनच... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, पहा व्हिडीओ
धर्मेद्र प्रधानांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात नेमकं काय? राजीनामा
Dharmendra Pradhan Resign | धर्मेद्र प्रधानांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात नेमकं काय? राजीनामा देताच...
NEET पेपरफुटी प्रकरणात सरकार झुकलं; धर्मेंद्र प्रधानांनी दिला राजीनामा
मोठी बातमी! NEET पेपरफुटी प्रकरणात सरकार झुकलं; धर्मेंद्र प्रधानांनी दिला राजीनामा
दिल्लीत मोठ्या घडमोडी! पुन्हा पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज अन्....
दिल्लीत मोठ्या घडमोडी! पुन्हा पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज अन् जंतर मंतरवर मोठा गोंधळ
गेल्या 12 वर्षात इतकं घाबरवलंय की... अभिजीत दीपके पत्रकार परिषद घेऊन
गेल्या 12 वर्षात इतकं घाबरवलंय की... अभिजीत दीपके पत्रकार परिषद घेऊन असं काय म्हणाला?
तीला काय देशाविषयी माहिती? काय देशाविषयी कळतं? राऊत नेमकं कुणावर भडकले
Sanjay Raut | तीला काय देशाविषयी माहिती? काय देशाविषयी कळतं? संजय राऊत नेमकं कुणावर भडकले?