Margaret Alva| उपराष्ट्रपती पदासाठी विरोधकांकडून मार्गारेट अल्वांचा उमेदवारी अर्ज दाखल, राहुल गांधी, मल्लिकार्जून खरगे, शरद पवारांची उपस्थिती

येत्या 6 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती पदासाठी मतदान पार पडणार आहे. या पदासाठी एनडीएकडून जगदीप धनकड यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. आज 19 जुलै हा या पदासाठीचे अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता.

Margaret Alva| उपराष्ट्रपती पदासाठी विरोधकांकडून मार्गारेट अल्वांचा उमेदवारी अर्ज दाखल, राहुल गांधी, मल्लिकार्जून खरगे, शरद पवारांची उपस्थिती
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी

|

Jul 19, 2022 | 2:44 PM

नवी दिल्लीः उपराष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षाकडून मार्गारेट अल्वा (Margaret Alva) यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि मल्लिकार्जून खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह इतर विरोधी पक्षनेत्यांच्या उपस्थितीत संसदेत अल्वा यांनी नामांकन अर्ज दाखल केला. येत्या 6 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती पदासाठी मतदान पार पडणार आहे. या पदासाठी एनडीएकडून जगदीप धनकड यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. आज 19 जुलै हा या पदासाठीचे अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. उद्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. तर 22 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. विद्यमान उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 11 ऑगस्ट रोजी संपणार आहे. सोमवारी 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा निकाल 21 जुलै रोजी जाहीर केला जाईल. राष्ट्रपती पदावर एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोण आहेत मार्गारेट अल्वा?

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा या मूळ कर्नाटकमधील मंगळुरू येथील असून त्यांचे शिक्षण बंगळुरु येथे झाले. 1974 मध्ये त्या पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून आल्या. त्यानंतर त्या राज्यसभेच्याच सदस्य राहिल्या. 1999 मध्ये त्या लोकसभेवर निवडून गेल्या. त्यांनी केंद्रात मंत्री म्हणूनही काम केलंय. मार्गारेट अल्वा यांनी राजस्थान आणि गोव्याचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिलं आहे. पाच वेळा खासदार असल्याने राजकीय अनुभव आणि प्रशासनावर उत्तम पकड असलेल्या नेत्या अशी त्यांची ओेळख आहे. उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची बैठक झाल्यानंतर शरद पवार यांनी मार्गारेट अल्वा यांच्या नावाची घोषणा केली होती. अल्वा यांच्या नावाला 17 विरोधी पक्षांची मान्यता मिळाली आहे.

एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड कोण?

राजस्थानच्या झुंझनू जिल्ह्यातील किठाना येथे 1951 मध्ये जन्मलेले जगदीप धनखड हे भाजपचे अनुभवी नेते आहेत. सैनिकी शाळेतून त्यांचे शिक्षण झाले. एलएलबीची डिग्री संपादन केलेल्या धनखड यांनी राजस्थान हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातही वकिली केली आहे. 1989 मध्ये लोकसभा निवडणुकीत जनता दलाच्या तिकिटावर ते खासदार झाले.

Jagdeep dhankhad

1993 मध्ये ते किशनगड येथून विधानसभेवर निवडून आले. 2019मध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले. आता उपराष्ट्रपतीपदासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. एनडीएतर्फे जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज सोमवारी 18 जुलै रोजी दाखल केला. हा अर्ज भरतेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें