AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कुठंतरी पाणी मुरतंय त्यामुळेच रवी राणांनी आरोप केले’; ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याने केली चौकशीची मागणी

आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या वादात आता विरोधकांनी देखील उडी घेतल्याचं पहायला मिळत आहे.

'कुठंतरी पाणी मुरतंय त्यामुळेच रवी राणांनी आरोप केले'; ठाकरे गटाच्या 'या' नेत्याने केली चौकशीची मागणी
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 30, 2022 | 10:32 AM
Share

औरंगाबाद :  आमदार बच्चू कडू (Bachu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वादाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या वादात आता विरोधकांनी देखील उडी घेतल्याचं पहायला मिळत आहे. विरोधकांकडून या वादाच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारवर टीका करण्यात येत आहे. कोणाला किती खोके पोहोचले यावरून आता आमदारांमध्ये भाडंण सुरू झाल्याचा टोला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी लगावला होता. त्यानंतर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी देखील या वादावरून शिंदे गटावर निशाणा साधला आहे. कुठेतरी पाणी मुरतंय, त्यामुळेच रवी राणा यांनी आरोप केल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.

दानवेंचा टोला

रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे यांनी खोचक टोला लगावला आहे. रवी राणा यांनी केलेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, कुठेतरी पाणी मुरतंय, त्यामुळेच रवी राणा यांनी आरोप केले असतील असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. त्यांनी या सर्व प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना जोरदार टोला लगावला आहे. आता दानवे यांच्या टीकेला शिंदे गट काय प्रत्युत्तर देणार हे पहाण महत्त्वाचं ठरणार आहे.

मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी

दरम्यान रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मध्यस्थी करणार आहेत. आज रवी राणा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. तर दुसरीकडे बच्चू कडू यांना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटण्यासाठी बोलावले आहे. दोन्ही आमदारांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देऊ नये अशा सूचना देखील वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या आहेत.

Follow Us
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा