“जेलमधल्या उमेदवाराला निवडून दिल्याने परभणी मागे, विजय भांबळे मंत्री असते” अजितदादांची सल पुन्हा उघड

जिंतूर येथील बँकेचा व्यवस्थापक पीक कर्ज देत नसल्याचं गाऱ्हाणं मांडण्यासाठी या तरुणाने अजित पवारांना फोन केला.

"जेलमधल्या उमेदवाराला निवडून दिल्याने परभणी मागे, विजय भांबळे मंत्री असते" अजितदादांची सल पुन्हा उघड

परभणी : परभणी जिल्ह्यातील जिंतूरचे आमदार विजय भांबळे यांचा (Ajit Pawar Audio Clip Viral) यावेळी विधानसभेत झालेला पराभव राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. अजित पवारांना एका तरुणाने केलेल्या फोनवरील संभाषणावरुन हे स्पष्ट झालं आहे. तर याच ध्वनीफितीत परभणी जिल्हा का मागासलेला आहे, याचे कारणही अजित पवारांनी सांगून टाकले (Ajit Pawar Audio Clip Viral).

हे संभाषण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि जिंतूर तालुक्यातील एका तरुणाचे आहे. या तरुणाचं नाव अद्याप पुढे आलेलं नाही. ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली.

जिंतूर येथील बँकेचा व्यवस्थापक पीक कर्ज देत नसल्याचं गाऱ्हाणं मांडण्यासाठी या तरुणाने अजित पवारांना फोन केला. यावेळी अजित पवारांनी पहिला शब्द काढला तो, “बरं केलं, तुम्ही विजय भांबळेला पाडलं ते”, असं म्हणत अजित पवारांनी उपहासात्मक चिमटा काढला. ते इथेच थांबले नाहीत, तर ‘विजय भांबळे आज मंत्री राहिले असते’, असं सांगून ही मोकळे झाले. शिवाय राष्ट्रवादीचे मधुसूदन केंद्रे यांना पाडून रासपच्या एका जेलमध्ये असलेल्या रत्नाकर गुट्टेना गंगाखेडकरांनी निवडून दिल्यानेच तुम्ही मागे आहात, असं अजित पवारांनी स्पष्ट शब्दात ठणकावलं. आमची जनता आमच्या दोन पिढ्यांना सतत निवडून देते, हे ही सांगायला ते विसरले नाहीत. सरते शेवटी तुझी काय अडचण आहे, ते मला व्हॉट्सअॅप कर मी त्यांना बोलतो, असंही अजित पवार म्हणाले.

यावरुन लक्षात येते की, जिंतूरच्या विजय भांबळे यांचा पराभव अजित पवारांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. जिंतूर मतदार संघातून 2019 ला भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी विद्यमान आमदार विजय भांबळे यांचा 2 हजार मतांनी पराभव केला. तो पराभव अजून ही अजित पवार विसरलेले नाहीत. त्याचं कारण म्हणजे अजित पवार रामप्रासाद बोर्डीकर यांच जून वैर आहे. तेव्हापासून बोर्डीकर फॅमिलीच्या विरोधात अजित पवारांनी दंड थोपटले आहेत. असं असलं तरी अजित पवारांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर विजय भांबळे मात्र भलतेच खुश झाले आहेत (Ajit Pawar Audio Clip Viral).

परभणी जिल्ह्यात 2014 ला गंगाखेड आणि जिंतूर असे दोन ठिकाणी दोन आमदार होते. गंगाखेडमध्ये धनंजय मुंडे यांचे दाजी (मेव्हणे) डॉ. मधुसूदन केंद्रे आमदार होते. त्यांच्या विरोधात युतीचे विशाल कदम आणि युतीचे बंडखोर रत्नाकर गुट्टे उभे होते. रत्नाकर गुट्टे यांच्या साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावे कोट्यावधींचा परस्पर कर्ज उचलल्याने रत्नाकर गुट्टे तुरुंगात होते, असं असताना आयत्यावेळी रासपच्या तिकिटावर रत्नाकर गुट्टे यांनी अर्ज दाखल केला आणि डॉ. मधुसूदन केंद्रे या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव केला. जेव्हा अजित पवारांची आणि रत्नाकर गुट्टे यांची भेट झाली, त्यावेळी रत्नाकर गुट्टे यांनी मी प्रचार न करताच जेलमधून निवडून आलो, असं अजित पवारांना सांगून परभणीकर किती वाया गेलेले आहेत, याची जणू प्राचितीच आणून दिली.

विजय भांबळे, डॉ. मधुसूदन केंद्रे, धनंजय मुंडे यांच्यामुळे अजित पवारांच्या मार्जितले आमदार होते. शिवाय, बाबाजानी दुर्हानी यांनी विधान परिषदेवर पाठवून राष्ट्रवादीने परभणी जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ही आपली ताकत वाढली होती. हीच ताकत लाऊन राष्ट्रवादीला मराठवाड्यात किमान एक तरी खासदार परभणीच्या रुपाने मराठवाड्यात निवडून आणायचा आहे. यावेळी राजेश विटेकरांच्या रुपाने राष्ट्रवादीने मोठी ताकत उभी केली होती. पण अवघ्या 40 हजारांच्या मताधिक्याने विटेकरांचाही पराभव झाला. पण, आता जिल्ह्यात एकही आमदार उरला नसल्याने शरद पवारांनी माजी मंत्री फौजिय्या खान यांना राज्यसभेवर तर बाबाजाणी दुर्हानी यांना विधान परिषदेवर पाठवलं आहे.

शिवसेनेच्या गडावर दादांची करडी नजर असल्याने विजय भांबळे यांना मंत्री देणं त्यांना आवश्यक वाटत होतं. पण, भांबळेंनाच जिंतूरकरांनी घराचा रस्ता दाखविल्याने दादांना स्वप्नावर विरजण पडलं आहे.

Ajit Pawar Audio Clip Viral

संबंधित बातम्या :

अजित पवार, धनंजय मुंडेंसह 11 नेत्यांना पोलिसांची नोटीस

“फडणवीस आणि मी एकत्र येणार म्हटलं, की लगेच ब्रेकिंग न्यूज” अजितदादांची टोलेबाजी

Published On - 3:54 pm, Tue, 1 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI