Eknath Shinde : सत्तेचा खेळ जोरात, अमित शाहांच्या उपस्थितीत झाली देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची बैठक?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी गुजरातच्या बडोद्यात बैठक झाल्याची माहिती मिळतेय. महत्वाची बाब म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Eknath Shinde : सत्तेचा खेळ जोरात, अमित शाहांच्या उपस्थितीत झाली देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची बैठक?
सागर जोशी

|

Jun 25, 2022 | 7:49 PM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचं निशाण फडकावल्यानंतर महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. शिंदे यांच्यासोबत 50 आमदार असल्याने सरकार अल्पमतात आल्याचा दावा केला जातोय. या परिस्थितीत आता राज्याच्या राजकारणात जोरदार हालचाली पाहायला मिळत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी गुजरातच्या बडोद्यात बैठक झाल्याची माहिती मिळतेय. महत्वाची बाब म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, या बैठकीतील अमित शाहांच्या उपस्थितीबाबत अद्याप कुठलीही पुष्टी आम्ही करत नाही.

सुधीर मुनगंटीवारांनी शक्यता फेटाळली

दरम्यान, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या बडोद्यात बैठक झाल्याची शक्यता फेटाळली आहे. देवेेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी रोज विविध कारणांसाठी चर्चा होत असते. काल, परवा आणि आजही फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी अशा प्रकारची कुठलीही माहिती त्यांनी दिलेली नाही. तसंच फडणवीस हे गुजरातला गेले नाहीत, असा दावा मुनगंटीवार यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना केलाय.

एकनाथ शिंदे यांचा रात्री अचानक गुजरात दौरा

एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशिरा हॉटेलमधून बाहेर पडले, त्यानंतर ते चार्टर प्लेनने गुजरातला गेले. तिथे त्यांची फडणवीस आणि भाजपाच्या बड्या नेत्यांशी भेटल्याची माहिती आहे. पहाटे पुन्हा ते हॉटेलमध्ये परतल्याची माहिती आहे. या बैठकीत पुढे राज्यात काय राजकारण घडणार, याची चर्चा यात झाली असण्याची शक्यता आहे. 16 आमदारांचे शिवसेना करत असलेले निलंबन, स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळण्यास होत असलेला उशीर या सगळ्या तांत्रिक बाबींवर चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी काल दुपारी एकनाथ शिंदे हे वकिलांच्या टीमला भेटण्यासाठीही हॉटेलमधून बाहेर दोन तास गेल्याचीही माहिती आहे.

आम्ही उद्धव ठाकरेंचा राजीनामा मागितला नाही- केसरकर

आम्ही मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली आहे. पण विषय दुसराच निघतो. आम्ही विनंती काय केली की शिवसेना-भाजपनं एकत्र यावं, ते काय म्हणतात की मी राजीनामा देतो. पण राजीनामा कुणी मागितलाच नाही. लोकांना भावनिक करण्याचं काम सुरु आहे, असं होऊ नये. शेवटी ते नेते आहेत. त्यांनी बाळासाहेबांनंतर पक्ष चालवला आहे. त्यांच्याकडून आमच्या काही अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात एवढीच आमची अपेक्षा आहे, असं दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेच्या शेवटी सांगितलं.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें