फक्त बिहार नाही, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, मध्य भारतातही भाजप, लोकांचा मूड समजून घ्या : देवेंद्र फडणवीस

“लोकांना बोलघेवडे नाही तर कर्मयोगी लोकं आवडतात. मोदी कर्मयोगी आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले (Devendra Fadnavis appeal people to vote BJP Candidate).

  • रोहित पाटील, टीव्ही 9 मराठी, सोलापूर
  • Published On - 17:31 PM, 24 Nov 2020
Shiv Sena leaders don't assume himself as Maharashtra says bjp Devendra Fadnavis

सोलापूर : “देशात काही दिवसांपूर्वी फक्त बिहारची निवडणूक नव्हती. तर अनेक राज्यांची पोटनिवडणूक होती. 10 तारखेला निकाल आला तेव्हा पूर्व भारतात आम्ही बिहार जिंकलो, उत्तर भारतात आम्ही उत्तर प्रदेश जिंकलो, पश्चिम भारतात गुजरात जिंकलो, मध्य भारतात मध्य प्रदेश जिंकलो, दक्षिणेत कर्नाटक आणि तेलंगणा जिंकलो. पूर्व, पश्चिम, उत्तर, मध्य, दक्षिण भारतामध्ये जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवला. याचा अर्थ समजून घ्या, लोकांचा मूड काय आहे, लोकांचं मत काय आहे, हे समजून घ्या. या निवडणुकीनं उभ्या देशाचं मत दाखवलं आहे”, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पंढरपुरात कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले (Devendra Fadnavis appeal people to vote BJP Candidate).

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारानिमित्ताने ते आज (24 नोव्हेंबर) पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी मतदारांना भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांना मतदान करण्याचं आवाहन केलं. यावेळी त्यांनी भाजपचा देशात वाढत असलेल्या विस्तारावर भाष्य केलं (Devendra Fadnavis appeal people to vote BJP Candidate).

“बिहारमध्ये किती संकट होते. एकीकडे कोरोनाचं संकट, दुसरीकडे पुराचं संकट आणि तिसरीकडे 25 लाख मजूर तिकडे गेले. या तिहेरी संकटातही लोकांनी मोदींना मतदान केलं. कारण लोकांना बोलघेवडे नाही तर कर्मयोगी लोकं आवडतात. मोदी कर्मयोगी आहेत”, असं फडणवीस म्हणाले.

“महाराष्ट्राचं मत यापेक्षा वेगळं नाही. महाराष्ट्रात मोदींवर विश्वास आहे. या सरकारविरोधात आक्रोश आहे. या सरकारने लोकांचा रोज विश्वासघात केला आहे. या सरकारने कोरोना काळात कुणाचीच चिंता केली नाही, केवळ भाषणं केली, त्या व्यतिरिक्त काही केलंच नाही”, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.

“निवडणुकीत अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य असतं. लोकशाहीत निवडणुकीत मत ही तुमची अभिव्यक्ती असते. चांगलं-वाईट जनतेपुढे आणि समाजापुढे आणण्याकरता तुमच्या मनातलं जे आहे ते व्यक्त करण्याकरता निवडणूक असते. त्यामुळे निवडणुकीत सहभागी होऊन तुमचा असंतोष व्यक्त करा”, असं आवाहन फडणवीस यांनी मतदारांना केलं.

हेही वाचा :

अजित पवारांसोबत पुन्हा शपथ घेणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

तीन दिवसांसाठी का होईना अजितदादांनी काकांना सोडले होते, हा इतिहास नाही का?; चंद्रकांतदादांचा टोला

पहाटेच्या शपथविधीची वर्षपूर्ती, आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ दिसेल : देवेंद्र फडणवीस