पवारांनी आदेश भावोजींना नव्हे, ऊसासाठी अमित शाहांनाच पत्र लिहिलं, मुख्यमंत्री आणि विद्वान संपादकांना ते माहिती नाही : फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर ऊसप्रश्नावरुन जहरी वार केला. Devendra Fadnavis attacks

पवारांनी आदेश भावोजींना नव्हे, ऊसासाठी अमित शाहांनाच पत्र लिहिलं, मुख्यमंत्री आणि विद्वान संपादकांना ते माहिती नाही : फडणवीस

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर ऊसप्रश्नावर जहरी वार केला. “गृहमंत्री अमित शाह हे साखर उद्योगासाठी नियुक्त मंत्रिगटाचे अध्यक्ष आहेत. मात्र मुख्यमंत्री आणि विद्वान संपादकांना ते माहिती नाही. इतकंच काय शरद पवारांनी साखरप्रश्नी आदेश भावोजींना नव्हे, तर अमित शाहांनाच लिहिलं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. (Devendra Fadnavis attack on Sanjay Raut and Uddhav Thackeray)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ च्या मुलाखतीत फडणवीसांच्या दिल्ली भेटीवरुन निशाणा साधला होता. साखरेचा प्रश्न घेऊन फडणवीस केंद्रीय गृहमंत्र्यांकडे गेल्याने, ठाकरेंनी फडणवीसांची एकप्रकारे टिंगल उडवली होती. त्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला.

फडणवीस नेमकं काय म्हणाले?

काल-परवा जी मुलाखत झाली, त्यामध्ये विद्वान संपादक ते विद्वान आहेत, मी चुकीच्या अर्थाने बोलत नाही. त्यांचे आमचे विचार पटो अथवा नाही, पण मला माहिती आहे की ते विद्वान आहेत. विद्वान आहेत ते तीन की चारवेळी राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांना सर्व कल्पना आहेत, पण ते प्रश्न विचारतात, का हो, साखरेचा प्रश्न घेऊन गृहमंत्र्यांकडे कशासाठी गेले? त्याला आमचे मुख्यमंत्री उत्तर देतात, साखर तर घरातच असते, गृहमंत्री म्हणजे आमचे घराचे मंत्री म्हणजेच आदेश भावोजी. काय चाललंय? अरे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती असू नये, की या राज्यातला जो सर्वात मोठा साखर उद्योग आहे, या उद्योगाच्या पुनरुजीवनासाठी मंत्रिगट तयार झाला आहे, त्या मंत्रिगटाचे प्रमुख अमित शाह आहेत. म्हणून त्यांना भेटल्याशिवाय साखर उद्योगाला मदत मिळू शकत नाही. म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो. आमच्यानंतर शरद पवारसाहेब यांनी देखील जे पत्र दिलं आहे ते पंतप्रधानांना लिहिलेलं नाही, ते कृषीमंत्र्यांना लिहिलेलं नाही किंवा ते आदेश भावोजींनाही लिहिलेलं नाही, त्यांनी ते पत्र भारताचे गृहमंत्री अमित शाह यांना लिहिलं आहे.

हे काम मुख्यमंत्र्यांचं आहे. महाराष्ट्रातील इतका मोठा ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. ज्या पद्धतीने यूपीची भूमिका योगी आदित्यनाथांनी मांडली, त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मांडायला हवी होती, पण आम्ही मांडायला गेलो कारण केंद्रात आमचं सरकार आहे. होय आमचं सरकार आहे. पण त्याचं कौतुक करण्याऐवजी, आमच्या मुख्यमंत्र्यांना आणि संपादकांना हेही माहिती नसेल की या उद्योगाच्या पुनर्जिवनाचं काम कोणाकडे आहे, तर या राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखऱ उद्योगाचं काय होणार हा प्रश्न आहे.

(Devendra Fadnavis attack on Sanjay Raut and Uddhav Thackeray)

संबंधित बातम्या 

रिक्षाचं स्टिअरिंग उद्धवजींच्या हातात, पण कुठे जायचं हे मागे बसलेले ठरवतात : फडणवीस

Uddhav Thackeray | भाजपने फंड दिल्लीला दिलाय, फडणवीसांना दिल्लीची चिंता : उद्धव ठाकरे   

हिंमत असेल तर सरकार पाडा” मुख्यमंत्र्यांचं भाजपला आव्हान, फडणवीसांनाही टोला 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *