AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धमकीचे फोन खरे की कुणी जाणीवपूर्वक करतंय, याची चौकशी झाली पाहिजे : देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ निवासस्थान उडवून देण्याची धमकी देणारा फोन आल्याचे काल समोर आले होते. ((Devendra Fadnavis On threat call)

धमकीचे फोन खरे की कुणी जाणीवपूर्वक करतंय, याची चौकशी झाली पाहिजे : देवेंद्र फडणवीस
| Updated on: Sep 07, 2020 | 4:58 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख या तिघांना धमकीचे फोन आले आहेत. याप्रकरणी नीट चौकशी झाली पाहिजे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis On threat call to Sharad Pawar Anil Deshmukh and CM Uddhav Thackeray)

“धमकीचा फोनबाबत नीट चौकशी झाली पाहिजे. हे फोन खरे आहेत की कुणी जाणीवपूर्वक करत आहे, या सर्व गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. ज्यांना धमकीचे फोन आले आहेत, त्यांची प्रशासनाने विशेषत: पोलिसांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे,” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अभिनेत्री कंगना रनौतला केंद्र सरकारकडून  Y+ दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. यावर फडणवीसांना विचारले असता ते म्हणाले, “आपण लोकशाही आणि संविधानाला मानतो तर कुठल्याही व्यक्तीचं जीवन त्याची सुरक्षा करण्याची जबाबदारी सरकारवर आहे. अभिनेत्री कंगना रनौतने जे वक्तव्य केलं त्याचं समर्थन करणार नाही. तरीदेखील ती मुंबईत येत असेल तर तिची सुरक्षेची जबाबदारी सरकारचीच आहे.”

“कायद्याच्या राज्यात काही वेळा जे अतिरेकी होते त्यांच्यावरही हल्ला होऊ नये म्हणून आपल्याला सुरक्षा द्यावी लागते. कंगना तर कलाकार आहे. तिने चुकीचं वाक्य केलं असेल म्हणून सुरक्षा देणार नाही किंवा तिच्यावर हल्ला करु, अशी भूमिका कुणालाही घेता येणार नाही. संविधानाने जे जबाबदारी दिले आहेत त्या पार पाडल्या पाहिजेत. पण कंगनाने जे वक्तव्य केलंय त्याचं निश्चितच निषेध केला पाहिजे,” असेही फडणवीसांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा – विधिमंडळ पावसाळी अधिवेशन | विधानपरिषद : उपसभापती पदाची निवडणूक जाहीर

“उपसभापती पद एकमताने कारावं, अशी आमचीदेखील भूमिका होती. आता हे अधिवेशन संपल्यानंतर लगेच अधिवेशन नाही. पुढच्या अधिवेशनातही ते करता आलं असतं. पण सदस्यांचा जाणीवपूर्वक मतदानाचा हक्क डावलून अशाप्रकारे लोकशाहीमध्ये निर्णय थोपण्याचं काम हे सरकार करत आहे. आमचंही मत आहे. आमचीदेखील मोठी संख्या आहे. आम्हीदेखीस निवडणुका करु शकतो. त्यामुळे आम्हीदेखील फॉर्म भरला आहे.” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली.

नेमकं प्रकरणं काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ निवासस्थान उडवून देण्याची धमकी देणारा फोन आल्याचे काल समोर आले होते. आता, शरद पवार यांनाही काल भारताबाहेरुन धमकीचा फोन आल्याची माहिती मिळत आहे. तर अभिनेत्री कंगना रनौतविषयी टिप्पणी केल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन आले. हे फोन कोणाकडून आले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. धमक्यांच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.

दुबईहून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक बोलत असल्याचा दावा करणारा फोन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आला होता. त्यामुळे ‘मातोश्री’ निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

दुबईवरुन शनिवारी रात्री 2 वाजता मातोश्रीवर फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने दाऊदला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे असल्याचं सांगत कॉल ट्रान्सफर करण्यास सांगितले. मात्र कॉल ऑपरेटरने फोन ट्रान्सफर केला नाही. सध्या याबाबतची चौकशी सुरु आहे. (Devendra Fadnavis On threat call to Sharad Pawar Anil Deshmukh and CM Uddhav Thackeray)

संबंधित बातम्या : 

दाऊद इब्राहिमच्या नावे मुख्यमंत्र्यांना फोन, ‘मातोश्री’ उडवण्याची धमकी

मुख्यमंत्र्यांनंतर शरद पवार आणि अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.