AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे सरकारचे हायकमांड देवेंद्र फडणवीसच, जयकुमार गोरे यांचं मोठं विधान; निशाणा कुणावर?

राऊत यांच्या या टीकेनंतर आणि अजित पवार यांचा सरकारमध्ये समावेश झाल्यानंतर पहिल्यांदाच भाजपकडून फडणवीस हेच हायकमांड असल्याचं म्हटलं गेलं आहे.

शिंदे सरकारचे हायकमांड देवेंद्र फडणवीसच, जयकुमार गोरे यांचं मोठं विधान; निशाणा कुणावर?
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 16, 2023 | 11:29 AM
Share

सातारा : राज्यात नवीन समीकरणे तयार झाली आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एक गट शिंदे सरकारमध्ये सामील झाल्याने ही समीकरणे तयार झाली आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. मात्र, राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार असो की खाते वाटप असो, प्रत्येक गोष्टीसाठी शिंदे सरकारमधील प्रमुखांना दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सातत्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घ्यावी लागत आहे. त्यामुळे या सरकारचे हायकमांड दिल्लीत असल्याची चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी वेगळच विधान करून सर्वांना धक्का दिला आहे.

भाजपा सातारा लोकसभा मतदारसंघाच्या वतीने टिफीन बैठकीचे साताऱ्यात आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह भाजप जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे आणि जिल्ह्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भारतीय बैठक मारून सर्वांनी एकत्र जेवण केल. या कार्यक्रमात आमदार जयकुमार गोरे यांनी सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत. हे विधान वरवर अजित पवार गटाला टोला असल्याचं मानलं जात आहे. पण या विधानातून गोरे यांनी शिंदे गटालाही टोला लगावल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजे गोरे यांनी एकाच विधानातून एका दगडात दोन पक्षी मारल्याचं स्पष्ट होत आहे.

समजनेवाले को…

राज्यातील शिंदे सरकारचा हायकमांड हे देवेंद्र फडणवीसच आहेत. कधी कोणाला सोबत घ्यायचं आणि कधी सोडायचं हे फडणवीस यांना चांगलंच समजतं. यामुळे समजनेवाले को इशारा काफी होता है, असं सूचक विधान जयकुमार गोरे यांनी केले आहे. आमदार गोरें नी केलेलं हे विधान नक्की कोणासाठी होतं याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. गोरेंचा निशाणा जिल्ह्यातील अजित पवार गटाकडे तर नव्हता ना? अशा सुद्धा चर्चांना आता साताऱ्यात उधाण आल्याचं पाहायला मिळतंय.

राऊतांनी डिवचले

दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपवर सातत्याने जोरदार टीका केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार दिल्लीत जाऊन अमित शाह यांना भेटत असल्याने त्यांनी ही टीका केली होती. शिंदे गटाचं हायकमांड पूर्वी मुंबईत होतं. मातोश्री होती. आता त्यांचं हायकमांड दिल्लीत आहे, अशी खोचक टीका राऊत यांनी केली होती. राऊत यांच्या या टीकेनंतर आणि अजित पवार यांचा सरकारमध्ये समावेश झाल्यानंतर पहिल्यांदाच भाजपकडून फडणवीस हेच हायकमांड असल्याचं म्हटलं गेलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.