AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE : उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने धक्का, एकदा चर्चा करायला हवी होती : देवेंद्र फडणवीस

राज्याच्या सत्तास्थापनेचा संघर्ष सुरु असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis press conference) आज अचानक पत्रकार परिषद बोलावली होती.

LIVE : उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने धक्का, एकदा चर्चा करायला हवी होती : देवेंद्र फडणवीस
| Updated on: Nov 08, 2019 | 5:56 PM
Share

मुंबई : राज्याच्या सत्तास्थापनेचा संघर्ष सुरु असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis press conference) आज अचानक पत्रकार परिषद बोलावली होती. स्वत: मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis press conference) ही पत्रकार परिषद बोलावल्याने, राज्याचं लक्ष त्याकडे लागलं होतं. सह्याद्री गेस्ट हाऊसवर संध्याकाळी 4.30 वा या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं.

उद्धव ठाकरेंच्या पहिल्याच पत्रकार परिषदेतील वक्तव्याने धक्का बसला. शिवसेनेने आमच्याशी सोडून सर्वांशी चर्चा केली. माझ्यासमोर अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची बोलणी ठरली नव्हती. असं असलं तरी युती तुटली नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

आमची युती तुटलेली नाही. आम्ही अजूनही युतीत आहोत त्यांनी जर तोडली असेल तर मला माहित नाही, असंही काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद जशीच्या तशी

मी आताच राज्यपालांना भेटून राजीनामा दिला आहे. राज्यपालांनी तो स्वीकारला आहे. गेली 5 वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे आभार, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पक्षाचे शीर्ष नेते,मंत्रिमंडळाचे सर्व मंत्री, अधिकारी कर्मचारी, या पाच वर्षात आमच्यासोबत असलेले आमचे मित्रपक्ष आणि नेते यांच्यासोबत महाराष्ट्राला सर्व आघाडीवर पुढे घेऊन गेलो. प्रमाणिकपणे पारदर्शकपणे महाराष्ट्रात काम करण्याचा प्रयत्न केला. मागील 5 वर्षातील 4 वर्ष दुष्काळाची, हे वर्ष अतिवृष्टीचं, या सर्व संकटांमध्ये शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम आमच्या सरकारनं केलं.

जलसंधारणाचं काम यशस्वीपणे लोकांच्या सहभागातून केलं. महाराष्ट्रात मोठं इन्फ्रास्ट्रक्चर, मेट्रो, रेल्वे, विमानतळ यांचं बांधकाम झालं. महाराष्ट्रासोबतच मुंबईसारख्या महानगरात या सरकारने अनेक प्रकल्प सुरू करुन मार्गी लावले. या सरकारने मागील 5 वर्षात ग्रामीण आणि शहरी अशा सर्वच भागात काम केले.

हा विजय यासाठी महत्त्वाचा आहे कारण आमचा स्ट्राईक रेट 70 टक्के म्हणजेच लढलेल्या जागांपैकी 70 टक्के जागा जिंकलो. ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागला, तेव्हा अपेक्षापेक्षा काही जागा कमी आल्या. मात्र, त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिलीच पत्रकारपरिषद घेतली. त्याचवेळी त्यांनी सरकार बनवण्याचे सर्व मार्ग खुले असल्याचं म्हटलं. तो आमच्यासाठी मोठा धक्का होता.

खरंतर जनतेने महायुतीला कौल दिला होता. अशास्थितीत त्यांनी अशी भूमिका का घेतली हे आम्हाला समजलं नाही. दुसरीकडे मी पहिल्याच पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली होती. उद्धव ठाकरेंचेही आभार मानले होते. मागील 15 दिवस ज्या प्रकारची वक्तव्यं महाराष्ट्रात पहायला मिळाली. जो अडीच वर्षांचा विषय आहे तो माझ्यासमोर कधीही या विषयावर निर्णय झालेला नव्हता. खरंतर एकदा या विषयावर एकदा चर्चा फिस्कटली होती. त्यानंतर आमची चर्चा झाली. त्यावेळी यावर चर्चा झाली नाही. दिवाळीच्या वेळी जी अनौपचारिक चर्चा झाली तेव्हाही मी याबाबत काही माहिती नसल्याचं सांगितलं.

मी आणि प्रदेशाध्यक्षांनी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनाही विचारलं. मात्र, असं काही बोललं नसल्याचंच समोर आलं. यात जे काही गैरसमज झाले ते आपआपसात चर्चा करुन सोडवणे शक्य होतं. मात्र, आम्ही चर्चाच करणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली.

मागील 5 वर्षात उद्धव ठाकरेंशी चांगले संबंध राहिले या पुढील काळातही राहतील. राजकारण आपल्या आपल्या जागेवर आहे. आम्ही अनेक विषयांवर चर्चा करुन मार्ग काढले. त्यांनी आमच्याशी चर्चा केली नाही याचं मला दुःख नाही. मात्र, आमच्याशी चर्चा न करता काँग्रेस राष्ट्रवादीशी चर्चा करायला शिवसेनेला दररोज दिवसातून 3-3 वेळा चर्चा करण्यास त्यांना वेळ होता.

त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच शिवसेनेकडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याच विचार होत होता. आता त्यांचं नेमकं काय ठरलं आहे, याची कल्पना नाही. कोण म्हणतो होणार कोण म्हणतं नाही. मात्र, त्यांनी पहिल्या दिवसापासून भाजपशी चर्चा न करता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा करण्याचं धोरण केलं ते योग्य नाही. त्यांच्या आजूबाजूची जी लोकं आहेत त्यांनी जी वक्तव्ये केली त्यामुळे त्यांना माध्यमांमध्ये जागा नक्कीच मिळेल. मात्र, आम्ही त्यांच्यावर टीका करणार नाही. आम्हाला अशी टीका करता येत नाही, त्यांच्या भाषेत उत्तर देता येत नाही असं नाही. आम्ही त्यांच्यापेक्षा अधिक आक्रमकपणे उत्तर देऊ शकतो. मात्र, आम्ही तोडणारे नाही तर जोडणार लोक आहोत.

विधानसभा निवडणुकीत तर नाहीच पण मागील 5 वर्षात देखील उद्धव ठाकरे यांच्यावर कधीही टीका केली नाही. मात्र, त्यांच्याकडून आमच्या वरिष्ठ नेत्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली. केंद्रातही सरकारमध्ये राहायचं आणि राज्यातही सरकारमध्ये राहायचं तरी त्या पक्षाच्या शिर्ष नेतृत्वावर टीका करायची हे आम्हाला मान्या नाही हे योग्य नाही.

जगाने ज्या मोदीजींचं नेतृत्व मान्य केलं त्यांच्यावर टीका करण्याचं काम आमच्या विरोधीपक्षांनीही केलं नाही ते आमच्या मित्रपक्षांनी केलं. आमचं म्हणणं हेच आहे की आपण सोबत राहणार असू तर अशाप्रकारची टीका, शब्द मोदींबद्दल वापरण सुरुच राहणार असेल तर अशाप्रकारचं सरकार का चालवायचं असा प्रश्न आमच्यासमोर आहे.

सध्या राज्यात खूप चिंताजनक स्थिती आहे. प्रचंड मोठ्या चक्रीवादळामुळे 315 तालुुक्यांमध्ये शेतकऱ्यांचं पीक खराब झालं आहे. शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहचणे गरजेचं आहे. अशा स्थितीत तात्काळ सरकार बनवणं आवश्यक होतं. त्यावेळी अधिक चांगले निर्णय घेता आले असते.

मी राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांनी वैकल्पिक व्यवस्था होऊपर्यंत काळजीवाहू काम पाहण्यास सांगितलं आहे. त्यामुळे ते सांगतील तोपर्यंत मी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करेन. त्यात धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. यासोबत मला वाटतं इतका स्पष्ट जनादेश दिल्यानंतर असं करणं हे त्याचा अपमान आहे. जनतेवर पुन्हा निवडणुका लादणं हे देखील योग्य नाही. यापुढील काळात जी स्थिती तयार होईल त्यात जे आवश्यक आहे जे योग्य आहे ते करु.

भाजप आमदार विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा जे आरोप करत आहेत त्यांनी पुरावे द्यावे असं आमचं आव्हान आहे. भाजप कोणतंही फोडाफोडीचं राजकारण करणार नाही.

आम्हाला फोडाफोडीची आवश्यकता नाही. येणाऱ्या काळात जे सरकार असेल ते भाजपच्या नेतृत्वातच बनेल असा आम्हाला विश्वास आहे. जनतेने जो कल दिला त्याबद्दल आभार मानतो. आम्हाला जनकौल मिळालेला असतानाही आम्ही सरकार स्थापन करु शकलो नाही त्याबद्दल दुःख आहे.

माध्यमांमधील माझ्या पत्रकार मित्रांनी जे सहकार्य केलं, कधी कधी टीकाही केली त्याबद्दल त्यांचेही आभार. आणि विरोधी पक्षांचेही आभार. ते आमचे शत्रू नाही त्यांनी त्यांचं काम केले. महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे. देशाची नजर महाराष्ट्रकडे होती, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेण्यापूर्वी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी राज्यभवनावर भाजप नेते आशिष शेलार, रावसाहेब दानवेही हजर होते. या भेटीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

एकीकडे शिवसेना मुख्यमंत्रिपदावर ठाम आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच व्हावा ही जनतेची इच्छा आहे, असं नमूद केलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष होतं.

संबंधित बातम्या 

अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्री ठरला नाही, देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री : नितीन गडकरी 

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.