Devendra Fadnavis : ‘मी पुन्हा आलो’ वर शिवसेनेचा निशाणा, फडणवीसांचं भाषण उसने अवसान! सामनातून टीका

Saamana Editorial : 'मी पुन्हा आलो आणि इतरांना पण सोबत घेऊन आलो, असे विधान यानिमित्त देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते गमतीचे आहे.'

Devendra Fadnavis : 'मी पुन्हा आलो' वर शिवसेनेचा निशाणा, फडणवीसांचं भाषण उसने अवसान! सामनातून टीका
देवेंद्र फडणवीसImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 05, 2022 | 7:34 AM

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर शिवसेनेच्या मुखपत्रातून निशाणा साधण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या एकनाथ शिंदेच्या (CM Eknath Shinde) अभिनंदनाच्या भाषणावरुन सामना अग्रलेखाद्वारे (Saamana Editorial News) टीका करण्यात आली आहे. मी पुन्हा येईन, यावरुन माझी टिंगल करण्यात आली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यालाच प्रत्युत्तर देताना त्यांनी मी पुन्हा आलो आणि इतरांना पण सोबत घेऊन आलो, असं विधान त्यांनी केलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं विधान गंमतीचं आहे, असं सामना अग्रलेखात म्हटलंय. ज्या प्रकारे ते आले ते त्यांच्या स्वप्नातही नसेल, अशा शब्दांत फडणवीसांना सामनातून टोला लगावण्यात आला आहे. बुधवारी एकनाथ शिंदे बहुमत चाचणीला सामोरे गेले. या चाचणीत त्यांचा विजय झाला. 164 मतं एकनाथ शिंदे यांच्या बाजूने पडली. त्यानंतर विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा प्रस्तावावर सभागृहातील नेत्यांनी भाषणं केली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा आलो’ असा उल्लेख आपल्या भाषणामध्ये केला होता.

सामनामध्ये नेमकं काय म्हटलंय?

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये सहा महिने सत्ता भोगा, या शिर्षकाखाली शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार आणि भाजप सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. यात देवेंद्र फडणवीसांचाही समाचार घेण्यात आलाय. या अग्रलेखात असं म्हटलंय, की…

शिंदे ह किती मजबूत, महान नेते आहेत यावर त्यांनी भाष्य केले पण फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापासून रोखणारी अदृश्य शक्ती कोण? हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. विधानसभेत भाजप व शिंदे गटाने विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेतला. हे चोरलेले बहुमत आहे. हा काही महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेचा विश्वास नाही. शिंदे गटावर विश्वास व्यक्त करताना भाजप आमदारांची डोकीही अस्वस्थ झाली असतील. फडणवीस यांचे अभिनंदनाचे भाषण हे सरळ सरळ उसने अवसान असल्याचे त्यांच्या चेहन्यावर स्पष्ट दिसत होते. मी पुन्हा आलो आणि इतरांना पण सोबत घेऊन आलो, असे विधान यानिमित्त देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते गमतीचे आहे. ज्या प्रकारे ते आले ते या स्वप्नातही नसेल. आधीची अडीच वर्ष से आलेच नाहीत व आताही दिल्लीच्या तडजोडीने ते लंगड्या बसले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत याचा विसर त्यांना पडू नये.

हे सुद्धा वाचा

‘तुम्ही संपाल, पण शिवसेना संपणार नाही!’

शिवसेना संपत होती म्हणून आम्ही बंड केल्याचे भंपक विधान काही फुटीर आमदार करीत आहेत. तुम्ही संपाल पण शिवसेना कधीच संपणार नाही, असाही सणसणीत टोला सामना अग्रलेखातून लगावण्यात आला.

शिंद्यांचे बंड म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे बंड नाही आणि त्यांच्या सोबत जे बंडखोर गुळाच्या ढेपेस चिकटले ते म्हणजे कोणी क्रांतिवीर नाहीत, असं म्हणत शिवसेनेनं बंडखोरांवर टीका केली आहे. बंडखोरांचे बोलणे व डोलणे काही दिवसांचे आहे. बहुमत जिंकले, महा महिने सत्ता भोगा. हाच सगळ्याचा गोषवारा आहे!, अशा शब्दांत सामनातून निशाणा साधण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.