AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : आरेत एकही झाड कापणार नाही, कांजूरचा आग्रह केवळ इगोसाठी; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

Devendra Fadnavis : मला असं वाटतंय की त्यांनी (उद्धव ठाकरे) फक्त इगो करता कांजूर मार्ग धरून ठेवला. मेट्रो कार शेड करिता आरेमध्ये एकही झाड कापायची गरज नाही. कार शेडचे 29 टक्के काम पूर्ण झालं आहे. तर एकूण प्रकल्पाचा 85 टक्के काम पूर्ण झालंय.

Devendra Fadnavis : आरेत एकही झाड कापणार नाही, कांजूरचा आग्रह केवळ इगोसाठी; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 12, 2022 | 8:11 AM
Share

नागपूर: आरे कारशेडच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आमनेसामने ठाकले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी मूळात आरेमध्ये एकही झाड कापायचे नसताना कांजूरचा आग्रह धरण्याचं कारणच नव्हतं. आरेतील काम बऱ्यापैकी पूर्ण झालं आहे. असं असतानाही केवळ इगोसाठीच कांजूरचा आग्रह धरण्यात आला होता, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच आरे कॉलनीत कारशेडसाठी (aarey car shed) एकही झाड कापणार नसल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला आहे. नागपूर येथे आले असता ते मीडियाशी बोलत होते. यापूर्वीही फडणवीस यांनी ठाकरेंवर कांजूर मार्गचा निर्णय अहंकारातून घेतल्याची टीका केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे आता देवेंद्र फडणवीस यांना काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कांजूरमार्गची जागा एका डेपोसाठी आधीपासूनच मागितली गेली आहे. मात्र त्याचा वाद असल्याने तो प्रकरण हायकोर्टात सुरू आहे. मेट्रो कारशेडची जागा मेट्रो थ्री करिता मागितलेली आहे. तर कांजूर मार्गची जागा मेट्रो सिक्ससाठी मागितली आहे. कांजूरमार्गची जागा मेट्रो थ्रीसाठी योग्य नाही हे आमच्या काळातल्या कमिटीने तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एसीएस सौनिक यांच्या हाय लेवल कमिटीनेही अहवालात स्पष्ट केलं आहे. कार शेड आरेमध्येच योग्य आहे. ते कांजूरमार्गमध्ये नेलं तर प्रचंड खर्च वाढेल आणि चार वर्षाचा उशीर होईल, असं ठाकरे यांनी नेमलेल्या समितीनेच म्हटल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

जनतेचे पैसे वाया जाऊ देणार नाही

मला असं वाटतंय की त्यांनी (उद्धव ठाकरे) फक्त इगो करता कांजूर मार्ग धरून ठेवला. मेट्रो कार शेड करिता आरेमध्ये एकही झाड कापायची गरज नाही. कार शेडचे 29 टक्के काम पूर्ण झालं आहे. तर एकूण प्रकल्पाचा 85 टक्के काम पूर्ण झालंय. त्यामुळे चार वर्ष प्रकल्प थांबवून पंधरा-वीस हजार कोटी रुपयांनी किंमत वाढवणे योग्य नाही. हे पैसे जनतेच्या खिशातील पैसे आहेत आणि हे अशा पद्धतीने आम्ही वाया जाऊ देणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

काळजी करू नका, खातेवाटप होईल

यावेळी त्यांनी खाते वाटपावरही भाष्य केलं. खाते वाटप लवकरच होईल. काळजी करू नका. लवकरच तुम्हाला माहिती मिळेल. तोवर तुम्हाला बरं आहे, तुम्ही दिवसभरात अनेक वेळेला खाते वाटप करत आहात. आम्ही पेपर फोडून टाकलं तर तुम्हाला काम नाही मिळणार, असा चिमटा त्यांनी मीडियाला काढला.

Follow Us
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य