AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणूक आल्यानंतर ऊसतोड कामगार आठवतात; धनंजय मुंडेंचा पंकजांना टोला

नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. प्रचाराची रणधुमाळी उडाली असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे भाऊ-बहिण आमने सामने आले आहेत.

निवडणूक आल्यानंतर ऊसतोड कामगार आठवतात; धनंजय मुंडेंचा पंकजांना टोला
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे
| Edited By: | Updated on: Dec 19, 2021 | 7:58 AM
Share

बीड : नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. प्रचाराची रणधुमाळी उडाली असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे भाऊ-बहिण आमने सामने आले आहेत. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. भाजपाला नगरपंचायत निवडणूक लढवायला साधा उमेदवार मिळत नसल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे.

सरकारकडून शेतकऱ्यांना मदत

पुढे बोलताना मुंडे म्हणाले की, बीड जिल्ह्याच्या विकासासाठी कोणीच प्रयत्न केला नाही. आजही बीड जिल्ह्याची ओळख ही ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून आहे. 12 डिसेंबर 2014 साली गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ऊसतोड महामंडळाची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र पाच वर्ष सत्ता असतानाही महामंडळाची निर्मिती करता आली नाही. या काळात महामंडळ दोनदा रद्द झाले. सत्ता गेल्यानंतरच ऊसतोड कामगारांची आठवण होते. जो जिल्हा सातत्याने दुष्काळ अनुभवत होता, त्या जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी झाली. मात्र अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले नाही. त्यांना 502 कोटी रुपयांची मदत मिळून दिल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

…तेव्हाच शिवाजी महाराज आठवतात

दरम्यान कर्नाटकात दोन दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. अज्ञात समाजकंटकांनी हे कृत्य केले होते. यावरून देखील धनंजय मुंडे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. कर्नाटकात आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली, परंतु भाजपाचा एकही नेता याबद्दल बोलला नाही. यांना फक्त निवडणुका आल्या तेव्हाच महाराज आठवतात असा टोलाही यावेळी धनंजय मुंडे यांनी लगावला.

संबंधित बातम्या

नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका करू नये; तेवढी त्यांची उंची नाही, गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर

राज्यभरात शिवरायांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला जाणार, कर्नाटकातील घटनेनंतर राष्ट्रवादीची घोषणा

‘देशाच्या कुठल्याही भागात शिवछत्रपतींचा अवमान होत असेल तर या विकृतीचा निषेधच- देवेंद्र फडणवीस

Follow Us
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट...
राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी
Dahi Handi in Mumbai | हजारो तरुणांनी मैदान फुललं! राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी; हजारो तरुणाईचा जल्लोष
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथक...
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथकांना मोठं आवाहन
आपल्याकडे म्हणतात ना ते... सूर्यकुमार यादवची मराठी ऐकली का?पहा दहीहंडी
आपल्याकडे म्हणतात ना ते... सुर्यकुमार यादवची मराठी ऐकली का? पहा दहीहंडी उत्सवातील मजेदार व्हिडीओ
मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर..
Dahi Handi in Mumbai | मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर रुग्णालयात उपचार सुरू