नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका करू नये; तेवढी त्यांची उंची नाही, गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर

भाजप नेते  नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी वापरला असे त्यांनी म्हटले होते. नितेश राणे यांच्या या टीकेला आता  मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका करू नये; तेवढी त्यांची उंची नाही, गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर
गुलाबराव पाटील
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 6:35 AM

जळगाव : भाजप नेते  नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी वापरला असे त्यांनी म्हटले होते. नितेश राणे यांच्या या टीकेला आता  मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नितेश राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमुखांबाबत बोलावे एवढी त्यांची उंची नसल्याचा घणाघात गुलाबराव पाटील यांनी केला आहे. ते जळगाव जिल्ह्यातील बोदवडमध्ये बोलत होते.

काय म्हणाले गुलाबराव पाटील? 

उद्धव ठाकरे यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांनीच नारायण राणे यांना राजकारणात आणले, राजकारणात मोठे केले. शिवसेनेमुळे ते मोठे झाले. त्यामुळे नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंबाबत बोलताना विचार करावा. नितेश राणे यांची उद्धव ठाकरेंबाबत बोलण्याएवढी उंची नसल्याची प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. शनिवारी शिवसेना नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावर प्रतिक्रिया देताना  नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला होता.

‘उद्धव ठाकरे हा व्यक्ती आयुष्यात कोणाचाच झालेला नाही’

‘राणे साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा याच रामदास कदमांना उद्धव ठाकरेंनी विरोधीपक्ष नेता बनवलं होतं. तेव्हा ते जिभेला हाड नसल्यासारखे आमच्यावर बोलायचे. आता कदमांसारख्या असंख्य शिवसैनिकांनी विचार करावा की, उद्धव ठाकरे तुम्हाला कसे वापरून घेतात. जेव्हा तुमचा वापर संपतो तेव्हा तुम्हाला च्युइंगमसारखे थुंकतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे रामदास कदम. आज मी रामदास कदमांना सांगेन की, तुमची आज काय अवस्था झाली आहे. तुम्ही आज राजकारणामध्ये कुठेच नाहीत आणि राणे साहेब केंद्रात मंत्री आहेत. या फरकाचा रामदास कदमांनी विचार करावा. उद्धव ठाकरे हा व्यक्ती आयुष्यात कोणाचाच झालेला नाही. उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी वापरला आहे. शिवसैनिकांनी  या घटनेतून बोध घ्यायला पाहिजे’, अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली होती. आता या टीकेला मंत्री गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे.

संबंधित बातम्या

राज्यभरात शिवरायांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला जाणार, कर्नाटकातील घटनेनंतर राष्ट्रवादीची घोषणा

‘देशाच्या कुठल्याही भागात शिवछत्रपतींचा अवमान होत असेल तर या विकृतीचा निषेधच- देवेंद्र फडणवीस

‘तुमचा वापर संपतो तेव्हा तुम्हाला च्युइंगमसारखं थुंकलं जातं’, रामदास कदमांवरुन नितेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.