धनंजय मुंडेंची चौकशी व्हायला हवी, त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे; निलेश राणेंची आग्रही मागणी

कोणी त्यांच्या व्यक्तिगत जीवनात काय करावे हा त्यांचा विषय आहे. पण जर आरोप झाले आहेत तर पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे," असं भाजप नेते निलेश राणे यांनी म्हटलंय. (Dhananjay Munde Neelesh Rane)

धनंजय मुंडेंची चौकशी व्हायला हवी, त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे; निलेश राणेंची आग्रही मागणी
भाजप नेते निलेश राणे यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर आता विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. भाजप नेते निलेश राणे (Neelesh Rane) यांनीसुद्दा धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत, बलात्कार प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केलीय. “कोणी त्यांच्या व्यक्तिगत जीवनात काय करावे हा त्यांचा विषय आहे. पण जर आरोप झाले आहेत तर पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे,” असं भाजप नेते निलेश राणे यांनी म्हटलंय. (Dhananjay Munde must have to resign from his ministerial post, demands BJP leader Neelesh Rane)

धनंजय राणे यांनी राजीनामा द्यावा

धनंजय मुंडे यांच्या यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे खुलासा केला होता. त्याच खुलाशाच्या आधारावरुन त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते असं म्हटलं जात आहे. या पार्श्वभूमीवर “निवडणूक आयोगााच्या नियमानुसार माहिती लपवणं हा गुन्हा समजला जातो. या गुन्ह्याखाली धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पहीजे,” अशी आग्रही मागणी निलेश राणे यांनी केली आहे.

पोलिसांनी सत्य बाहेर आणावं: देवेंद्र फडणवीस

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांची चौकशी झाल्यानंतर भूमिका मांडू असं सांगितलं होतं.  “धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हायला हवी. धनंजय मुंडे यांनी स्वत: कबुली दिली आहे. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू”, अशी भूमिका विरोधी पक्षनेते देवेXद्र फडणवीस यांनी मांडली होती.

धनंजय मुंडेंनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील

भाजप प्रदेशाध्यक्ष चंदकांत पाटील यांनीसुद्धा मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपावर भाष्य करत त्यांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी केली होती. “मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्यामुळे तत्काळ राजीनामा दिला पाहिजे. मुंडेंवरील लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. भाजप महिला शाखेने एक पत्रक काढून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे आम्हीही या विषयावर आणखी जोरदार मागणी करत आहोत,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.

संबंधित बातम्या :

हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, भाजप महिला आघाडी आक्रमक

धनंजय मुंडेंच्या कबुलीनाम्यावर परळीकर काय म्हणतायत?

बलात्कार प्रकरण भोवणार?; धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीचं नेमकं काय होणार?

(Dhananjay Munde must have to resign from his ministerial post, demands BJP leader Neelesh Rane)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI